सध्या काही आघाडीच्या मराठी मालिकांमध्ये खूप मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये “आई कुठे काय करते” मालिकेत अभि व अंकिताचे लग्न, देवमाणूस मालिकेमध्ये देवी सिंगला झालेली अटक, मुलगी झाली हो मालिकेचे झालेले पुनरागमन, रंग माझा वेगळा मालिकेत दीपा कार्तिक मधील वाढता दुरावा असे अनेक ट्विस्ट फॅन्सना पाहायला मिळाले. त्यामुळेच मालिकांच्या टीआरपी मध्ये काही बदल झालेले पाहायला मिळाले.

 

अभि अंकिताच्या लग्नामुळे आई कुठे काय करते या मालिकेला मोठा फटका बसला आहे. प्रसारक प्रेक्षक संशोधन परिषदेने(BRAC) जाहीर केलेल्या नवीन टीआरपी यादीत आई कुठे काय करते या मालिकेला टॉप 5 मध्ये देखील जागा मिळविता आली नाही. गेल्या काही आठवड्यापासून टॉप 5 मध्ये स्टार प्रवाह वरील मालिकांचा दबदबा पाहायला मिळत होता व आत्ताही फक्त झी मराठीची देवमाणूस ही मालिका टॉप 5 मध्ये आहे.

Marathi serial june TRP

टीआरपीच्या नवीन आकडेवारीत 5 क्रमांकावर फुलाला सुगंध मातीचा ही मालिका असून गेल्या आठवड्यात ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर होती. या मालिकेत कीर्ती व तिची सासू जिजी अक्का यांच्यात प्रेम वाढत असून मालिकेचा टीआरपी वाढण्याची शक्यता आहे. तसेच, येणाऱ्या काही दिवसात शुभम व कीर्ती या दोघांमधील प्रेमाचा बहर वाढताना दिसून येणार आहे.

Marathi serial june TRP
झी मराठी वाहिनीच्या देवमाणूस या लोकप्रिय मालिकेत अजित कुमार देव उर्फ देवी सिंग याला एसीपी दिव्या सिंग हीने अटक केली. यामुळे मालिकेच्या प्रेक्षक संख्येत वाढ झाली असून याच कारणाने मालिकेने 4था क्रमांक पटकाविला. बऱ्याच आठवड्या नंतर झी मराठीची मालिका टॉप 5 मध्ये आली आहे. ही मालिका निरोप घेणार की चालू राहणार हे येणारा काळच सांगेल.

Marathi serial june TRP
सुरुवातीपासूनच टीआरपी मध्ये अग्रेसर असणाऱ्या रंग माझा वेगळा या मालिकेने टीआरपीच्या यादीत तिसरा क्रमांक पटकाविला आहे. दीपा व कार्तिक या दोघांमधील दुरावा कमी होत असतानाच श्वेताने रचलेले कट कारस्थान या ट्विस्ट मुळे रंग माझा वेगळा मालिकेला तिसरा क्रमांक मिळू शकला आहे. गेल्या आठवड्यात ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर होती.

Marathi serial june TRP
जयदीप गौरीच्या प्रेमाला सुंदररित्या मांडलेल्या सुख म्हणजे नक्की काय असतं? या मालिकेला टीआरपी मध्ये दुसरा क्रमांक मिळाला आहे. शालिनी व देवकीच्या कारस्थानाना जयदीप नेहमीच गौरीच्या मदतीला असलेलं पाहायला मिळत असते. सध्या मालिकेत शिर्के पाटलांच्या महिला विरुद्ध पुरुष सामना होणार असून यामुळे ही मालिका नंबर एकला देखील जाऊ शकते.

Marathi serial june TRP
टीआरपीच्या यादीत स्टार प्रवाह वाहिनीच्या “मुलगी झाली हो” या मालिकेने पहिला क्रमांक पटकाविला आहे. मालिकेच्या सेटवर अनेकांना कोरोनाची लागण झाल्याने काही दिवस मालिकेची शुटिंग बंद होती. परंतु पुनरागमन करून मालिका चक्क पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहचली. सिद्धांत व शौनक पैकी कोण माऊचे प्रेम मिळवू शकेल हे लवकरच कळण्याची शक्यता आहे.

Marathi serial june TRP
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *