सध्या मराठी मालिकांमध्ये लोकप्रियतेच्या बाबतीत टॉप 5 मध्ये “मुलगी झाली हो” ही मालिका नेहमीच दिसून येत असते. स्टार प्रवाह वरील या मालिकेने टीआरपी मध्ये आघाडीला राहून नेहमीच सातत्य ठेवले आहे. कोरोनामुळे या मालिकेचे शूटिंग बंद होण्यापूर्वी ही मालिका टीआरपी मध्ये दुसऱ्या स्थानावर होत.

Mulagi zali ho viral dance


“मुलगी झाली हो” ही मालिका यशस्वी होण्यामागे मालिकेची मुख्य नायिका माऊ म्हणजेच दिव्या सुभाष हीचा महत्त्वाचा वाटा आहे. दिव्या सोबतच सध्या मालिकेत योगेश सोहानी(शौनक) व सिद्धार्थ खिरीद(सिद्धांत) यांचा देखील महत्त्वाचा रोल दाखविण्यात येत आहे. सध्या या तिघांचा एक पडद्यामागचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

Mulagi zali ho viral dance

या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ, शौनक व माऊ हे तिघे “मास” या गाण्यावर नाचताना दिसून येत आहेत. हे तिघेजण नेहमीच ऑफ स्क्रीन धमाल करताना दिसून येत असतात. काही कारणास्तव “मुलगी झाली हो” ही मालिका काही दिवस बंद होती. आता परत एकदा मालिका सुरू झाल्याने हे कलाकार एकत्र येऊन परत तीच धमाल करताना दिसून येत आहेत.

 

मालिकेचे भाग प्रसारित होणे थांबण्याअगोदर काही मोठ्या घटना घडलेल्या पाहायला मिळाल्या. माऊ ही शौनकच्या प्रेमाला नकार देते व त्यामुळे या दोघांतील दुरावा वाढलेला दिसला. तसेच, दुसरीकडे सिद्धांत व माउच्या घरच्यांनी या दोघांच्या लग्नाला संमती दिल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे मालिका एका मनोरंजक वळणावर येऊन थांबली आहे.

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *