स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका “मुलगी झाली हो” सध्या रंजक वळणावर येऊन थांबली आहे. या मालिकेत सिद्धांत व शौनक सध्या माऊचे प्रेम मिळविण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहेत. त्यामुळे माऊ नक्की कोणाची होणार हे लवकरच कळेल. परंतु, आता या मालिकेतून एक अभिनेत्री लवकरच निरोप घेताना दिसणार आहे.

Mulgi zali ho serial news

“मुलगी झाली हो” मालिकेत दिव्याचे पात्र साकारणारी प्रतीक्षा मुणगेकर ही अभिनेत्री आता मुलगी झाली हो मालिकेचा निरोप घेणार आहे. सध्या मुलगी झाली हो मालिकेतील राजनच्या मदतीने दिव्या ही माऊच्या खीर मध्ये विष मिसळताना दिसून येत आहे. उत्तम खलनायिका म्हणून लोकप्रिय झालेली प्रतीक्षा मालिका सोडत असल्याने फॅन्स नाराज झाले आहेत.

Mulgi zali ho serial news

प्रतीक्षाने जरी “मुलगी झाली हो” मालिकेचा निरोप घेतला असला तरी ती आता कलर्स वाहिनीवरील नवीन मालिकेत दिसून येणार आहे. “मुलगी झाली हो मालिकेतील दिव्या या भूमिकेला भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आभारी आहे. पुढील आयुष्यात देखील माझ्यावर प्रेम कायम असुद्यात. भेटूया लवकरच. धन्यवाद.” असे कॅपशन टाकत मालिका सोडत असल्याचे संकेत प्रतीक्षाने दिले होते.

Mulgi zali ho serial news

आता प्रतीक्षा परत एकदा पोस्ट करीत कलर्स मराठीवरील “जीव माझा गुंतला” या नवीन मालिकेत दिसून येणार असल्याचे सांगितले आहे. “मी म्हटले होते ना भेटूया लवकरच.” असे सांगत प्रतीक्षाने नवीन पात्र फॅन्सना पाहायला मिळणार असल्याचे सांगितले. तब्बल 3 वर्षांनंतर प्रतीक्षा परत एकदा कलर्स मराठी वाहिनीवर दिसणार आहे. यापूर्वी प्रतीक्षा घाडगे अँड सून या मालिकेत दिसून आली होती.

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *