टेलिव्हिजन क्षेत्रातून सध्या एक धक्कादायक बातमी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेत्री निशा रावल हीने तिच्या पतीवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. निशाचा पती लोकप्रिय अभिनेता करण मेहरा असुन तो “ये रिश्ता क्या कहलाता है” या मालिकेसाठी प्रसिद्ध आहे. निशाने पती करणबद्दल काही धक्कादायक माहिती सांगितली आहे.

Nisha karan mehra news


31 मे 2021 रोजी निशा रावल ने गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार तिने करण विरोधात मारपीट केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे करणला 31 मे च्या रात्रीच अटक करण्यात आली होती. निशाच्या डोक्याला जखम झालेली एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली, ज्यात तिचा चेहऱ्यावर रक्त दिसून येत होते. यावरून हे प्रकरण गंभीर असल्याचे समजते.

निशा रावल हीने डोक्याला पट्टी बांधून मीडिया समोर आली व म्हणाली, “करण अगोदरपासूनच माझ्यासोबत गैरवर्तन करायचा. तो मला नेहमीच शारीरिक व मानसिक त्रास देत गेला. परंतु, काल रात्री त्याने मला तुझा चेहरा देखील पाहायचा नाही, असे म्हटले. काल त्याने मला मारहाण केली व माझा गळा दाबण्याचा प्रयत्न देखील केला.” असा खळबळजनक आरोप निशाने करणवर लावला आहे.

तसेच, निशाने करणचे दुसऱ्या मुलीसोबत अफेयर असल्याचे देखील म्हटले आहे व त्याने यापूर्वीही खूपदा तिला मारहाण केल्याचे म्हटले आहे. परंतु, सहन न झाल्याने निशाने शेवटी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे करण ने आरोप फेटाळून लावत स्वतः निशाने भिंतीवर डोकं आपटल्याचे म्हटले. 1 जून रोजी करणला जामीन देखील मिळाली आहे. परंतु, हे प्रकरण लवकर शांत होणार नसल्याचे दिसून येत आहे.

Nisha karan mehra news
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *