आज दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा पहिला स्मृतिदिन आहे. 14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूत हा बांद्रा येथील राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेनंतर सुशांतच्या फॅन्स मध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरुद्ध प्रचंड राग निर्माण झाला होता. परंतु, आज सुशांतच्या स्मृतिदिनी रियाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Rhea on sushant death anniversary

रीयाने सोशल मीडियावरील पोस्ट मध्ये असे म्हणली, “असा एकही क्षण नाही आणि विश्वास पण बसत नाही की तू येथे नाही. कोणीतरी म्हटलं होतं, की वेळेनुसार सर्वकाही ठीक होईल परंतु तूच माझा वेळ होतास आणि तूच माझे सर्वकाही होतास. मला माहित आहे की तूच आता माझा पालक, देवदूत आहेस. मला तू चंद्रावरून दुर्बिणीने पाहत आहेस व माझे रक्षण करत आहेस.”

Rhea on sushant death anniversary

रिया पुढे म्हणाली, “मी रोज तुझ्या येण्याची व उचलून घेण्याची वाट पाहत असते, मी सर्वत्र तुला शोधत असते. मला माहित आहे की तू माझ्या बरोबरच आहेस. हे स्वप्न दररोज तुटते. परंतु मला नंतर तुझे बोलणे आठविते तुला ‘हा बेबू मिळाला आहे’. हा विचार करूनच प्रत्येक दिवस घळविते. जेंव्हा मला कळते की तू इथे नाहीस त्या प्रत्येक वेळी भावनाचा झरा ओसंडून वाहतो.”

“हे लिहीत असताना माझ्या अंतकरणात खूप वेदना होत आहेत. तुझ्याशिवाय माझे जीवन व्यर्थ आहे. ही उणीव भरणे काढणे शक्य नाही. मी आणखीन तुझ्यासाठी उभी आहे. मी वचन देते की तुला रोज मालपुआ देईन व सर्व भौतिक पुस्तके वाचेन. प्लीज माझ्याकडे परत ये.” अशा शब्दात रियाने सुशांत बद्दल आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *