जगात अनेक लोकांमध्ये टॅलेंट असते, परंतु ते टॅलेंट जगासमोर येण्यासाठी योग्य वेळ येण्याची गरज असते. सोशल मीडियावर तर असे काही लोक रातोरात फेमस झालेले आपण पाहिले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक जोडपे खूपच चर्चेचा विषय ठरत असून सगळीकडे त्यांचेच व्हिडिओ दिसून येत आहेत. ते दोघे नक्की कोण आहेत, हे आज जाणून घेऊयात.

Sachet parampara new song


व्हिडिओ मधून व्हायरल झालेल्या या दोघांचे नाव सचेत टंडन व परंपरा ठाकूर आहे. हे दोन्ही नावे तसे नवीन नाहीत. यापूर्वी हे दोघे & TV वाहिनीवरील द व्हाइस इंडिया या शो च्या पहिल्या सिझन मध्ये दिसून आले होते व दोघे टॉप 4 मध्ये देखील पोहचले होते. त्यानंतर या दोघांनी इंडस्ट्रीला काही लोकप्रिय गाणी देखील दिली आहेत.

कबीर सिंग चित्रपटातील बेखयाली, टॉयलेट चित्रपटातील काही गाण्यांना सचेत व परंपरा यांनीच गायले व संगीतबद्ध केले होते. हे दोघे काही काळ एकमेकांना डेट करून 27 नोव्हेंबर 2020 रोजी लग्नबंधनात अडकले होते. या दोघांनी गायलेल्या “मीरा के प्रभू” या गाण्याला सोशल मीडियावर तब्बल 3 करोड पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. अनेकजण त्यांची गाणी स्वतःच्या स्टेटस मध्ये ठेवताना दिसून येत आहेत.

 

परंपराने स्ट्रीट डान्सर मधील मुकाबला हे गाणं गायीले होते. तसेच, तिने टी सीरिज साठी नुकतेच गायलेले छोड देंगे या गाण्याला तब्बल 31 करोड लोकांनी पाहिले आहे. त्यामुळे सचेत व परंपरा हे दोघे जरी नवीन नसले तरी या दोघांना खरी लोकप्रियता आत्ताच मिळताना दिसून येत आहे. म्हणूनच सध्या या जोडीला नेटकऱ्यांकडून पसंती मिळताना दिसून येत आहे.

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.