महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या पाहता महाराष्ट्र सरकारने सर्व मालिका व चित्रपटांच्या शूटिंगला महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे सर्व मराठी मालिकांचे शूटिंग राज्याबाहेर करण्यात आले. या कारणाने सर्व कलाकारांना त्यांच्या कुटुंबांपासून दूर राहावे लागले होते. आज फादर्स डे निमित्त अभिनेता सचिन देशपांडे याने मुली बद्दल भावनिक पोस्ट लिहिली आहे.

Sachin deshpande on father's day

अभिनेता सचिन देशपांडे सध्या “पाहिले न मी तुला” मालिकेत काम करीत असून तो संपूर्ण टीम सोबत गेली 2 महिने परराज्यात होता. इतक्या दिवसांनंतर परत येणे व 6 महिन्याच्या मुलीला भेटल्याने तो खूपच आनंदी झाला. सचिन म्हणाला, “आज माझ्या पहिल्याच्या दिवशीच बरोबर दोन महिन्यांनी मला मीरा ला भेटायला मिळालय. खुप इच्छा होती की निदान आजचा दिवस तरी तिच्या बरोबर घालवता यावा आणि तसंच झालं.”

Sachin deshpande on father's day

पुढे तो म्हणाला, “गेले दोन महिने शूटिंग निमित्त बाहेर असल्याने मीराला फक्त व्हिडिओ कॉल वर भेटता यायचं. त्यामुळे प्रत्यक्ष भेटल्यावर मीरा काय react करेल असं वाटतं होत. आणि आज तीला भेटल्यावर लक्षात आलं की मीरा आता माणसं ओळखायला लागली आहे. तीला कडेवर घेतलं आणि एक सेकंद माझा चेहरा बघून तीने जे काही रडायला सुरुवात केली आहे.”

“गेले दोन महिने हा माणूस आपल्या नजरेत नव्हता आणि आज अचानक मला कडेवर घेतोय हे तीच्या डोळ्यात दिसत होत, कोण आहे हा माणूस? पण ह्या सगळ्यात समाधान हे होत की आता मीरा थोडी मोठी झालीये, माणसं ओळखायला लागलीये. सहा महिन्याच्या आतच ही प्रगती पाहता 5G ला पण कॉम्प्लेक्स येईल ह्यात शंका नाही. मला “बाप माणूस” केल्या बद्दल मीरा तुझे खूप खूप आभार.” अशा सुंदर शब्दात सचिनने मनातील भावना व्यक्त केल्या.

Sachin deshpande on father's day


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *