सध्या देशभरात संकटाचे वातावरण असून सर्वत्र को’रोनाची दुसरी लाट आलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे को’रोनाची लस घेण्यासाठी अनेक ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. काही दिवस बंद ठेवल्यानंतर परत एकदा लसीकरणाला सुरुवात झाली आहे. अशातच काही अभिनेत्री लस टोचून घेताना स्वतःच्या व्हिडिओ पोस्ट करताना दिसून येत आहेत.

Sai tamhankar troll


लस टोचून घेताना आरती सिंग, अर्चना लोखंडे, हिना पांचाळ या अभिनेत्रींनी यापूर्वी फोटोज व व्हिडिओ पोस्ट केले होते. त्या पोस्ट्स मुळे या अभिनेत्रींना चांगलेच ट्रोल व्हावे लागले होते. आता मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हनकर हिला देखील याच कारणाने ट्रोलींगचा सामना करावा लागत आहे. खरे तर 18 वर्षापुढील अनेकांना लस उपलब्ध नसताना यांना कसे मिळतो असा प्रश्न नेटकरी करीत आहेत.

Sai tamhankar troll

आपल्या आकर्षक अदांसाठी व उत्तम अभिनयासाठी लोकप्रिय असणारी अभिनेत्री सई ताम्हनकर हिने काल लस टोचून घेतली. लस टोचून घेतानाचा व्हिडिओ सईने तिच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये ती इंजेक्शनला घाबरत असल्याचे दिसून आले. परंतु, यामुळे तिला काही वाईट कमेंटचा तिला सामना करावा लागला.

 

एका यूजरने म्हटले, “50 रुपये ओव्हर ॲक्टिंगचे कट करा.” “दीदी इतर मुलींना घालवू नकोस. तुझं बघून त्या लस घेणार नाहीत”, असे काही युझर्सनी कमेंट केली. तर एका महिलेने “इथे लोकांना लस मिळत नाही आणि तुला मिळत आहे तर इतका ड्रामा करीत आहेस” असे म्हटले. काही असो पण व्हिडिओज पोस्ट करण्याचा सोशल मीडियावर जणू ट्रेंडच चालू झाला आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *