सध्या मराठी मालिकांमध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वच मालिकांचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. आई कुठे काय करते, मुलगी झाली हो, सुख म्हणजे नक्की काय असतं?, रंग माझा वेगळा, फुलाला सुगंध मातीचा, सांग तू आहेस का अशा काही मालिकांनी गेल्या काही महिन्यांपासून स्टार प्रवाह वाहिनीला आघाडीवर नेऊन ठेवले आहे. परंतु, येत्या काही दिवसात एक लोकप्रिय मालिका निरोप घेताना दिसणार आहे.

Marathi serial news

काही मराठी मालिकांमध्ये सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका “सांग तू आहेस का?” ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. नवीन मालिकेचा प्रोमो आला असून त्या मालिकेचा वेळ रात्री 10 वाजता आहे व “सांग तू आहेस का?” या मालिकेचा वेळ देखील 10 वाजताच आहे.

 

सध्या “सांग तू आहेस का?” मालिकेत डॉ. वैभवीला मृत वैभवी आरशात असल्याचा भास होत असून मृत वैभवीची डॉ. वैभवी यातून सुटका होणार का हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही भागात मृत वैभवी आरशा बाहेर आल्याचे पाहायला मिळू शकते. आणखीन तरी सांग तू आहेस का? ही मालिका निरोप घेणार की नाही हे कळू शकले नाही, परंतु, “जय भवानी जय शिवाजी” या नवीन मालिकेचा वेळ पाहता ही मालिका निरोप घेण्याची शक्यता आहे.

“जय भवानी जय शिवाजी” मालिकेचा प्रोमो आला असून या मालिकेत शिवरायांची भूमिका भूषण प्रधान हा अभिनेता साकारताना दिसणार आहे. तसेच, बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत अजिंक्य देव असणार आहेत. मालिकेचा प्रोमो पाहून अनेक शिवभक्तांच्या मनात या मालिकेबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *