काही महिन्यांपूर्वी झी मराठी वाहिनीवर आलेली “पाहिले न मी तुला” ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसून येत आहे. या मालिकेत दाखविण्यात आलेले मनू अनिकेतचे प्रेम व समर म्हणजेच शशांक केतकर यांची खलनायिकेची भूमिका प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा बिंदू ठरला आहे. आज आपण या मालिकेतील अशा एका अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहोत जिच्या फोटोज सोशल मीडियावर युवा पिढीला आकर्षित करतात.

Sanika kashikar biography
“पाहिले न मी तुला” मालिकेत ज्या ऑफिस मध्ये समर व मानसी आहेत त्याच ऑफिस मध्ये ईशा नामक पात्र दाखविण्यात आले आहे. ईशाचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचे खरे नाव सानिका काशीकर हे आहे. सानिकाचा जन्म 15 मे रोजी मुंबई येथे झाला असून ती तिथेच लहानाची मोठी झाली. तिने तिचे शिक्षण एल. एस. रहेजा महाविद्यालयातून पूर्ण केले.

Sanika kashikar biography
सानिकाने इंटेरियर डिझायनर मधून पदवी घेतली असून तिला तिच्या अभिनयाची आवड महाविद्यालयात असल्यापासूनच झाली होती. तिने त्यानंतर अनेक नाटक, टिव्ही जाहिराती, मालिका व वेब सीरिजमध्ये काम केले आहे. सानिकाच्या अभिनयाची खऱ्या अर्थाने सुरुवात सोनी मराठी वाहिनीवरील “आनंदी हे जग सारे” या मालिकेतून झाली होती. त्यानंतर ती स्टार प्रवाह वाहिनीवरील “वैजू नंबर 1” या मालिकेत देखील दिसून आली होती.

Sanika kashikar biography
तसेच, सानिका काशीकर ने अमेझॉन प्राईम वरील एका वेब सीरिज मध्ये देखील एक पात्र साकारले होते. अभिनेता ऋषी सक्सेना याच्या सोबत सानिकाने “द राईट वन” या शॉर्ट फिल्म एक पात्र साकारताना दिसून आली होती. सानिका सोशल मीडियावर खूपच ॲक्टीव असते व तिच्या सुंदर व बोल्ड फोटोज् पाहून अनेक दिग्गज अभिनेत्रींना मागे टाकेल, असेच दिसून येते. सानिका काशीकर हिला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *