गेल्या अनेक महिन्यांपासून जीम बंद असल्याने जीम शौकिनांसाठी हा काळ खूप कठीण गेला. अनेकांनी स्वतःवर अथक मेहनत करून बनविलेली बॉडी लॉकडाऊन मुळे कमी झाली. परंतु, आता अनलॉक केल्याने परत जीम सुरू झाली व ही जीम शौकिनासाठी आनंदाची बातमी ठरली. अशाच जीमची आवड असणाऱ्या एका महिलेचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ मधील महिलेची नाव शर्वरी इनामदार असून त्या पुण्याच्या सदाशिव पेठेत राहतात. शर्वरी या एक आयुर्वेदिक डॉक्टर असून त्यांनी पुण्यातील टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. लोकं जीम मध्ये जाताना नाईट सूट किंव्हा खेळात वापरले जाणारे कपडे घालतात, परंतु, शर्वरी या साडी घालून ज्या कारणाने जीम मध्ये गेल्या ते वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. शर्वरी इनामदार म्हणाल्या, “मी जरी डॉक्टर असले तरी मी मराठी कुटुंबात राहते. आपल्या संस्कृतीत सणाला महिला नवीन साडी घालतात. मला जीम करण्याची आवड असल्याने परत जीम उघडल्यामुळे मला आनंद झाला. त्यामुळे हा माझ्यासाठी एक उत्सव असून साडी घालून व्यायाम करण्याचा निर्णय घेतला. त्याचा व्हिडिओ पोस्ट केला व तो व्हायरल झाला.”
शर्वरी इनामदार या गेल्या 13 वर्षापासून आयुर्वेद मध्ये प्रॅक्टिस करीत असून त्यांनी मागील 5 वर्षापासून आहार आयुर्वेद नावाचे डाएट क्लिनिक सुरू केलं आहे. महिलांनी तर फक्त चालणे आणि योगा करणे यावरच न थांबता वजन उचलण्याचा व्यायाम करावा, जेणेकरून महिलांचे हाडे मजबूत राहतील, असे आवाहन केलं शर्वरी इनामदार यांनी आहे. परंतु, साडी मध्ये व्यायाम केल्याने त्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.