गेल्या वर्षीच्या म्हणजेच 14 जून 2020 रोजी बॉलिवूडला हादरवून टाकलेल्या सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाला रोज काही ना काही वळण येत आहेत. मुंबई, बिहार पोलिसासहीत सीबीआय ने देखील या प्रकरणात काही व्यक्तींची चौकशी केली होती. सुशांतला न्याय मिळावा यासाठी सर्वच स्तरातून मागणी करण्यात होती. परंतु, आजपर्यंत त्याला न्याय मिळू शकला नाही.

Sushant sing on board

आज सुशांतचा प्रथम स्मृतिदिन असल्याने अनेकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. अभिनेत्री अंकिता लोखंडे, रिया चक्रवर्ती, सारा अली खान अशा अनेकांनी सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला. या प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला संकटाचा सामना करावा लागला होता. सुशांतच्या दोन्ही बहिणी व सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे ही नेहमीच आपल्या पोस्ट मधून सुशांतला न्याय मिळवून देण्याची मागणी करीत आल्या.

Sushant sing on board

सुशांतची बहिण श्वेता सिंग सुशांत संबंधित भूतकाळातील अनेक आठवणींना उजाळा देत एक पोस्ट केली होती. त्यात श्वेताने सुशांतच्या एका पांढऱ्या फळ्याचा (व्हाईट बोर्ड) फोटो पोस्ट केला आहे. ज्यावर सुशांतने त्याच्या दैनिक नित्यक्रम बाबतीत लिहिले आहे. त्या बोर्डवर सुशांतने एक अशी गोष्ट लिहिली आहे जी वाचून सुशांतचे फॅन्स देखील भावूक झाले आहेत.

Sushant sing on board

14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केली असली तरी त्याने मृत्यूच्या काही दिवस अगोदर त्या बोर्डवर 29 जून पासून व्यायाम करणार असल्याचे लिहिले आहे. म्हणजेच सुशांत ने भविष्याबाबत विचार करीत होता हे यावरून स्पष्ट होते. त्या बोर्डवर सुशांतने पुस्तके वाचणे, चित्रपट व वेब सीरिज पाहणे, गिटार शिकणे, ध्यानधारणा करणे, स्वभावतलचा परिसर स्वच्छ करणे, ज्या गोष्टी केल्या नाहीत त्या करणे अशा काही गोष्टी सुशांतने लिहून ठेवल्या आहेत. या पोस्ट मुळे सुशांतने आत्महत्या केली आहे की त्यांचा खून करण्यात आला? हा प्रश्न कायम तसाच राहिला आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा शेयर करायला विसरु नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *