जेंव्हा कलाकार एकमेकांसोबत काम करीत असतात, तेंव्हा त्यांच्यात चांगले नाते, जिव्हाळा तयार होत असतो. आपण अनेकदा काही ऑन स्क्रीन जोड्याना खऱ्या आयुष्यात देखील एकत्र आलेले पाहिले आहे. काही महिन्यांपूर्वी झी मराठी वाहिनीवर येऊन गेलेली मालिका अग्गबाई सासूबाई मालिकेतील शुभ्रा व सोहम यांच्यात देखील जवळीकता निर्माण झाली आहे.

Tejashree pradhan birthday special


अग्गबाई सासूबाई मालिकेत तेजश्री प्रधान हीने शुभ्राची भूमिका साकारली होती, तर आशुतोष पत्की याने सोहमची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे हे दोघांमध्ये एक घट्ट मैत्री झाली आहे. आज दिनांक 2 जून रोजी तेजश्रीचा वाढदिवस असल्याने आशुतोषने तेजश्रीला स्पेशल शुभेच्छा दिल्या आहेत.

Tejashree pradhan birthday special

“माझी प्रिय मैत्रीण, मला तुला सांगायचं आहे की तू माझ्यासाठी खूप काही आहेस आणि मी कायम तुला हृदयात ठेवेन. मला नेहमीच पाठिंबा दिल्याबद्दल, मला प्रोत्साहित केल्याबद्दल आणि मला माणूस व अभिनेता म्हणून वाढण्यास मदत करण्यासाठी तुझे आभार.” अशा शब्दात आशुतोषने तेजश्रीचे कौतुक केले.

 

पुढे आशुतोष म्हणाला, “तुझ्या वाढदिवशी मी तुला 2 टिप्स देतो, एक म्हणजे तू Past(भूतकाळ) विसर, जे तू कधीच बदलू शकणार नाहीस आणि दुसरे Present(गिफ्ट) विसर, जे मी आणले नाही” अशा गंमतशीर पद्धतीने आशुतोष ने तेजश्रीला शुभेच्छा दिल्या. त्या पोस्टवर तेजश्री कमेंट करून म्हणाली, “मी तुझ्या टिप्सपैकी एक गोष्ट नक्की विसरेन पण “present” कधीच नाही. चांगले राहील की तू मला एक दे. तुझ्या सुंदर पोस्ट साठी आभार” अशा म्हणत तेजश्रीने आशुतोष कडून गिफ्ट मागितले.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *