जेंव्हा कलाकार एकमेकांसोबत काम करीत असतात, तेंव्हा त्यांच्यात चांगले नाते, जिव्हाळा तयार होणे साहजिक असते. आपण अनेकदा काही ऑन स्क्रीन जोड्याना खऱ्या आयुष्यात चांगले मित्र राहिलेले पाहत असतो. काही महिन्यांपूर्वी झी मराठी वाहिनीवर येऊन गेलेली मालिका अग्गबाई सासूबाई मालिकेतील शुभ्रा व सोहम यांच्यात देखील अशीच जवळीकता निर्माण झाली आहे.

Tejashree pradhan on ashutosh patki

अग्गबाई सासूबाई मालिकेत तेजश्री प्रधान हीने शुभ्राची भूमिका साकारली होती, तर आशुतोष पत्की याने तेजश्रीला वाढदिवसाच्या स्पेशल शुभेच्छा दिल्याने अनेक फॅन्सना दोघांमध्ये काहीतरी चालू आहे, असे वाटले होते. “तू तुझा भूतकाळ विसर” आशुतोषच्या या वाक्याने फॅन्स नी गैरसमज करून घेतला होता. परंतु, आता स्वतः तेजश्री प्रधान ने “मुंबई टाईम्स”ला दिलेल्या मुलाखतीत सर्व गोष्टीचा खुलासा केला आहे.

 

 

तेजश्री म्हणाली, “आशुतोष व माझ्यात फक्त एक चांगली मैत्री आहे. म्हणूनच त्याने तो फोटो माझ्या वाढदिवशी पोस्ट केला. आमच्या दोघात काहीतरी चालू आहे अशा अफवा तर मालिका सुरू असताना देखील व्हायच्या. त्यामुळे माझ्यासाठी या गोष्टी नवीन नाहीत. परंतु, आमच्या दोघात मैत्री पलीकडे काहीच नाही.”अशा स्पष्ट शब्दात तेजश्रीने अफवांना पूर्ण विराम दिला.

 

तेजश्रीचे चाहते नेहमीच तिच्या लग्नाबद्दल उत्सुक असतात. त्याबद्दल बोलताना तेजश्री म्हणाली, “मलाही खरेच लवकरात लवकर लग्न करून सेटल व्हायला नक्की आवडेल. मनासारखा मुलगा भेटला तर मी येत्या 6 महिन्यात पण लग्न करेल. मला समजूतदार आणि तितकाच जबाबदार मुलगा लग्नासाठी हवा. अभिनय क्षेत्रातील असला तरी चालेल पण त्याने मला लग्नासाठी विचारावे अशी माझी इच्छा आहे” असे तेजश्रीने होणाऱ्या नवऱ्याबद्दल अपेक्षा व्यक्त केल्या.

Tejashree pradhan on ashutosh patki

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *