Yami gautam

लॉकडाऊन काळात अनेक सेलेब्रिटी लग्नबंधनात अडकलेले पाहायला मिळाले. मराठी कलाकारांसह काही बॉलिवुड कलाकारांनी देखील लग्न केल्याचे दिसून आले. काहींनी फॅन्सना पूर्व कल्पना देऊन लग्न केले तर काहींनी अचानक लग्नाची बातमी देऊन फॅन्सना सुखद धक्का दिला. आता आणखीन एका बॉलिवूड अभिनेत्रीने लग्नाची गाठ बांधल्याची बातमी समोर आली आहे.

Yami gautam marriage news


बॉलिवूडमध्ये स्वतःच्या हिंमतीवर लोकप्रिय झालेली अभिनेत्री यामी गौतम हीचा आज दिनांक 4 जून रोजी विवाह सोहळा पार पडला. यामीने लेखक व दिग्दर्शक आदित्य धर सोबत याच्यासोबत लग्नाची गाठ बांधली. आदित्य याने “उरी द सर्जिकल स्ट्राईक” या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते व त्याच चित्रपटात यामीने महत्वाची भूमिका साकारली होती.

Yami gautam marriage news

यामीने तिच्या लग्नाची कसलीही कल्पना न देता कमी लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा उरकून घेतला. तिच्या लग्न केलेल्या पोस्टला पाहून अनेक फॅन्सना सुखद धक्का बसला. यामी व आदित्य हे उरी चित्रपटापासूनच एकमेकांना डेट करीत असल्याचे ऐकण्यात येत आहे. यामी व आदित्यने एकच कॅप्शन टाकून लग्न केल्याची बातमी फॅन्सना दिली.

“तुझ्यामुळे मी प्रेम करायला शिकले आहे. काही कुटुंबियांच्या आम्ही लग्नबंधनात अडकलो आहे. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित हे लग्न पार पडले आहे. आमच्या प्रेम व मैत्रीच्या या प्रवासाला तुमच्या आशीर्वादाची व शुभेच्छाची गरज आहे.” असे कॅपशन टाकून दोघांनी फॅन्स सोबत हि आनंदाची बातमी शेयर केली.

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *