सिनेसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांना अभिनया सोबतच जाहिराती देखील कराव्या लागतात. मोठ्या सेलिब्रिटींना काही चांगल्या प्रोडक्ट्सच्या जाहिराती मिळतात तर स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना मिळेल त्या जाहिराती कराव्या लागतात. आता एका अभिनेत्रीने तर चक्क कमोडची जाहिरात केली आहे.

Actress Mahi vij troll

हिंदी मालिकांमधून अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री माही वीज ही तिच्या एका पोस्ट मुळे चांगलीच चर्चेत आली आहे. माही वीजने एक पोस्ट करताना त्यात शौचालयातील कमोड सोबतच्या फोटोज् पोस्ट केल्या. कॅप्शन मध्ये संबंधित कमोड विकणाऱ्या कंपनीची तिने जाहिरात केल्याचे दिसून आले. याच जाहिरातीमुळे तिला चांगलेच ट्रोल देखील व्हावे लागले.

 

काही नेटकऱ्यानी माहीला अशा प्रतिक्रिया दिल्या, “ॲड करण्यासाठी आणखीन काही मिळाले नाही का?”, “हा माहिती तुम्ही श्रीमंत आहात, जास्त दिखावा करू नका”, “पैशासाठी काहीही करणार का”, “बस्स फक्त हेच पाहायचं राहिले होते.” अशा अनेक कमेंट्स मधून माहीला ट्रोल करण्यात आले. तसेच, यात काही सकारात्मक कमेंट देखील होत्या.

 

अभिनेत्री माही वीज ही अभिनेता जय भानुशाली याची पत्नी आहे. या दोघांचा विवाह 2011 मध्ये झाला असून त्यांना तीन अपत्य देखील आहेत. माहीने बालिका वधू, लागी तुझसे लगन, लाल इश्क, ससुराल सिमर का अशा अनेक मालिकांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. मुलीच्या जन्मापासून माही अभिनयापासून दूर असली तरी एका जाहिरातीच्या पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे.

Actress Mahi vij troll

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *