सध्याच्या युगात एखाद्या गाण्याबद्दल इतकी चर्चा होवू जाते की त्या गाण्यावर स्वतःचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा ट्रेण्ड बनून जातो. मराठी मुलांनी तयार केलेले “नारलन पाणी” हे गाणे इतके गाजले की या गाण्यावर अनेक सेलिब्रिटींनी डान्सचे व्हिडिओ बनविले. अभिनेता रितेश देशमुख याला देखील यावर व्हिडिओ बनविण्याचा मोह आवरला नव्हता.

नारलन पाणी या अल्बम गाण्यावर यापूर्वी अनेक मराठी कलाकार थिरकताना दिसून आले होते. आता “सुंदरा मनामध्ये भरली” या मालिकेतील अभिनेत्रीने देखील यावर डान्स केलेला व्हिडिओ पोस्ट केला आहे. मालिकेत लतिकाची भूमिका साकारणाऱ्या अक्षया नाईक या अभिनेत्रीचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. अक्षयाने यापूर्वीही काही डान्स व्हिडिओ पोस्ट केले होते.

मालिकेत लतिकाच्या मोठ्या दिराची भूमिका साकारणारा आशुतोष सोबत अक्षया सुंदर डान्स केला आहे. अभिनया सोबतच ती एक उत्तम डान्सर देखील आहे. 12 जुलै 1995 ला जन्मलेल्या अक्षयाचा आज 26वा वाढदिवस आहे. आजचा वाढदिवस माझ्या साठी खूपच स्पेशल होता असे तिने पोस्ट द्वारे सांगत फॅन्सचे आभार मानले.

Akshaya Naik Birthday special

मालिकेत अभि लतिकाला 20 लाखाचे कर्ज फेडल्यानंतर सोडणार असल्याचे बापूला समजते. हा सर्व कट कामिनी घडवून आणताना दिसली. परंतु, सध्या अभि हा लतिकाच्या प्रेमात पडलेला दिसून दोघांच्या प्रेमाचा रंग फुलताना दिसून येत आहे. मर्द मराठी तर्फे सर्वांची लाडकी लतिका म्हणजेच अक्षया नाईक हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Akshaya Naik Birthday special

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *