मराठी चित्रपटसृष्टी मधील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर ही अभिनयासोबतच एक उत्तम डान्सर असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. नटरंग चित्रपटातील “वाजले की बारा” या गाण्यावर अमृताने केलेला डान्स पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले होते. खरे तर तेंव्हापासूनच अमृताच्या डान्सचे कौशल्य फॅन्सना दिसू लागले होते.

Amruta khanvilkar new dance video

सध्या अमृता सोशल मीडियावर जास्तच ॲक्टीव असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिने तिच्या फोटोज् व व्हिडिओज पोस्ट केल्यामुळे ती फॅन्ससाठी आकर्षणाचा बिंदू ठरत आहे. आता अमृताचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून तिच्या डान्सला पाहून अनेकांनी वाहवाही केलेली दिसून येत आहे.

 

ताल चित्रपटातील “ताल से ताल मिला” या गाण्यावर अमृता ज्या प्रकारे थिरकत होती ते पाहून अनेक फॅन्स नी ऐश्वर्या रायपेक्षा सुंदर डान्स केल्याचे म्हटले. मुंबईच्या पवई तलावाजवळ अमृता खानविलकर व कोरीयोग्राफर आशिष पाटील यांनी या डान्सला उत्तमरीत्या साकारले. काही तासातच या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, काही सेलिब्रिटींनी या डान्सची प्रशंसा देखील केली आहे.

Amruta khanvilkar new dance video

अमृता खानविलकर हीने यापूर्वी डान्स इंडिया डान्स – सीझन 6 व नच बलीये – सीझन 7 मध्ये तिच्या डान्सचे जलवे दाखविले होते. सध्या सगळीकडे पावसाचे वातावरण असताना अमृताने या गाण्यावर डान्स करून फॅन्ससाठी पावसाळ्याचा आनंद द्विगुणित केला आहे. अनेकजण अमृताचा हा डान्स व्हिडिओ शेयर करताना दिसून येत आहेत.

Amruta khanvilkar new dance video

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *