सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर त्याला नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतात. काहीजण व्हिडिओला सकारात्मकरित्या पाहून आनंद घेताना दिसतात तर काहीजण विनाकारण व्हिडिओ मधील व्यक्तींना ट्रोल करताना दिसून येतात. सध्या एका लग्नातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसून येत आहे.

Ankita prabhu walavhkar video

दिनांक 21 जून 2021 रोजी विजय मुणगेकर व मयुरी मुणगेकर यांचा विवाहसोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यात विजयची मैत्रीण अंकिता वालावकर ही देखील उपस्थित होती. अंकिताने विजय सोबत एक व्हिडिओ बनविला ज्यात अंकिता विजयला “अजूनही वेळ निघून गेलेली नाही, चल उठ पळून जा, कशाला लग्न करतोस” असे इशारे करताना दिसत आहे.

सर्वत्र सोशल मीडियावर या व्हिडिओला पाहून अनेकांना हसू आवरले नाही. अनेकांनी या व्हिडिओत अंकिता ही विजयला सोबत पळून जाऊ असे इशारे करीत असल्याचा गैरसमज करून घेतला. परंतु, या दोघांना काही नेटकऱ्यानी तर ट्रोल करण्याचा देखील प्रयत्न केला. त्याला अंकिताने देखील चांगलाच समाचार घेतल्याचे दिसून आले.

Ankita prabhu walavhkar video

खरे तर हा व्हिडिओ बनविण्याचा प्लॅन अंकिता व विजय यांनी लग्नाच्या 3 दिवस अगोदर पासूनच केला होता व तो व्हिडिओ बनविण्यासाठी त्यांना 3-4 वेळा रिटेक देखील घ्यावा लागला होता. व्हिडिओ मधील विजय मुणगेकर हा म्हणजेच मुलगी झाली हो मालिकेत दिव्याचे पात्र साकारणारी अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर हीचा चुलत भाऊ आहे. त्यामुळे या व्हीडिओला फक्त गंमत म्हणून पाहा असे मयुरीने ट्रोलर्सना म्हटले.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *