झी मराठी वाहिनीवरील “देवमाणूस” या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळविले. या मालिकेने झी मराठीचा घसरलेला टीआरपी वाढविण्यास मदत केली आहे. गेल्या काही आठवड्यापासून या मालिकेत बरेच ट्विस्ट आलेले पाहायला मिळाले. आता मालिकेतून एका अभिनेत्रीने निर्गमन झाल्याचे समजते.

Dev manus aarya Deshmukh news

या मालिकेत सुरुवातीपासून ते आजपर्यंत रेश्मा, मंजुळा, दिव्या सिंग, आर्या या काही पात्रांनी फॅन्स वर भुरळ घातल्याचे दिसून आले. काही अभिनेत्रींचे मालिकेतील रोल संपला असल्याने मालिका सोडावी लागली होती. आता त्यात आणखीन एका अभिनेत्रीची भर पडणार असून मालिकेत वकिलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनाली पाटील हीने आता तूर्तास तरी मालिकेतून बाहेर पडली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील “वैजू नंबर 1” मालिकेतून सोनाली पाटील ही वैजूच्या भूमिकेतून प्रकाश झोतात आली होती. देवमाणूस मालिकेत काहीच काळ आर्या देशमुख ची साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली. परंतु, आता मालिकेतील तिचा रोल तूर्तास तरी संपला असल्याने पुढील काही एपिसोड्स मध्ये ती मालिकेत झळकणार नाही.

 

 

सोनाली पाटील या अभिनेत्रीचा जन्म लातूर येथे झाला असून ती मूळची कोल्हापूर येथील आहे. कोल्हापूर येथेच ती लहानाची मोठी झाली. एक टिकटॉक स्टार म्हणून लोकप्रिय असलेली सोनाली पाटील आता अभिनय क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करताना दिसून येत आहे. तिचा अभिनय पाहता ती भविष्यात नक्कीच स्वतःचे नाव कमवेल, हे नक्की.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *