सत्यघटनेवर आधारित असलेली झी मराठी वाहिनीवरील “देवमाणूस” ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. मालिका जरी सत्य घटनेवर आधारित जणू असली तरी या मालिकेत अनेक बदल दाखविण्यात आले आहेत. मालिकेचा खलनायक म्हणजेच मालिकेत बोगस डॉक्टरची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याने तर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आहे.

Dev manus marathi serial

देवमाणूस मालिकेतील अन्य कलाकारांनी देखील प्रेक्षकांच्या मनावर आपापली छाप पाडली आहे. आज्जी, टोण्या, दिव्या सिंग, डिंपल, मंगल, बाबू ही काही पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेचा कथानक ज्या प्रकारे मांडण्यात आले, त्यावरून मालिकेच्या फॅन्सना ही मालिका बंद झालेले पाहणे कठीण जाणार हे नक्की. परंतु, सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार एक वेगळीच अपडेट समोर आली आहे.

 

गेल्या काही आठवड्यापासून देवमाणूस मालिकेत जे काही दाखविण्यात आले त्यानुसार मालिकेची कथा सत्यघटनेपेक्षा खूपच वेगळी सुरू असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मालिकेत यापुढे आणखीन काही ट्विस्ट येणार असून मालिका इतक्यात तरी बंद होणार नसल्याचे समजते. सध्या मालिकेत अभिनेत्री देवी सिंगच्या भावाबाबतीत मोठा ट्विस्ट दाखविण्यात आला आहे.

Dev manus marathi serial news

मालिकेत सरकारी वकील आर्या देशमुख हीने देवी सिंगला दोषी ठरविण्यात सर्व शर्थीचे प्रयत्न करून पाहिले, परंतु, देवी सिंगने अखेर तिच्या सर्व खेळी मोडून काढताना दिसून येत आहे. येणाऱ्या काही भागात आणखी मोठा ट्विस्ट येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. तसेच, मालिकेत एसीपी दिव्या सिंगची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा खान मालिका सोडणार नसल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.

Dev manus marathi serial

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *