झी मराठी वाहिनीवरील “देवमाणूस” या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळविली. या मालिकेतील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. खास करून मालिकेतील टोण्या व सरू आज्जी या पात्रांना तर फॅन्सनी जास्तच पसंत केले. मालिकेतील टोण्याने आता विठ्ठलाकडे एक साकडे घातले आहे.

Dev manus new serial news

मालिकेत टोण्याचे पात्र विरल माने या 14 वर्षीय बाल कलाकाराने उत्तमरीत्या साकारले आहे. विरलने आपल्या मनातील खंत विठुरायाकडे बोलून दाखविला. तो म्हणाला, “आज आषाढी एकादशी आहे. पण कोरोना असल्याने आपण विठ्ठलाला भेटू शकत नाही. पण मी आज विठ्ठला बरोबर बोलणार आहे. विठ्ठला ऐकतोस ना माझ्या मनातला आक्रोश?. का माझा आवाज पट्टी खाली दाबून राहिला आहे?” असे प्रश्न विरलने माऊलीला विचारले.

 

पुढे विरल म्हणला, “सर्व जगाचा आक्रोश ऐकून तुझे कान सुन्न झाले असतील. अरे सांग ना तुझं नाव जपायला मी कुठे कमी पडलो. मी मातीत बीज देखील तुझ्याच नावाने टाकतो. माझं मन देखील तुझ्याच नावाने हलके करतो. विठ्ठला, डोळे बंद केल्यास तुझे रूप जर डोळ्यासमोर नाही आले तर मला झोप नाही लागत. कसला हा राग आहे तुला?”

“गेल्या 2 वर्षापासून तू आपल्या वाड्याचे दार बंद करून ठेवले आहेस. कोणाला बोलत नाही, कोणाबरोबर भेटत नाहीस. असे कसे चालेल विठ्ठला. माझ्या सारख्या गरीब वारकऱ्यांनी आपलं गाऱ्हाणं घेऊन कोणाकडे जायचं? मी तर असे ऐकलं आहे की नामा, जना, जनी हे तर तुला एसटीत बसून भेटायला देखील येत आहेत. मग मी का नाही यायचं तुला भेटायला. सांग ना विठ्ठला, सांग ना” अशा शब्दात विरलने अप्रत्यक्षरीत्या जगाला कोरोना पासून सुरुक्षित करण्याचे विठूरायाकडे साकडे घातले आहे.

Dev manus new serial news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *