झी मराठी वाहिनीवरील “देवमाणूस” या मालिकेने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडून काढले. गेल्या काही महिन्यात मालिकेच्या प्रेक्षकसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. या मालिकेने झी मराठीचा घसरलेला टीआरपी वाढविण्यास खूप मदत केली आहे. परंतु ही मालिका निरोप घेणार का हा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला होता.

Dev manus marathi serial

मालिकेत बोगस डॉक्टरची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याने स्वतः लाईव्ह येऊन मालिका बंद होणार की नाही याबद्दल माहिती दिली आहे. गेल्या काही आठवड्यापासून मालिकेत अनेक चढउतार पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे काहीवेळा मालिका निरोप घेणार का असा प्रश्न फॅन्सना पडला होता. एका फॅन्सने लाईव्ह मध्ये याबद्दल किरणला प्रश्न विचारला.

किरण उत्तर देताना म्हणाला, “मालिका इतक्यात बंद होणार नाही. मालिकेत आता चंदा नावाचे पात्र आले असून मालिकेत यापुढे बरेच ट्विस्ट पाहायला मिळतील. चंदा सोबत माझे लग्न झालेले आहे की नाही हे येणाऱ्या काही भागात कळेलच.” किरणने असे अप्रत्यक्षरीत्या मालिका बंद होणार नसल्याचे प्रेक्षकांना सांगितले. या लाईव्ह मध्ये त्याच्या सोबत डिंपल देखील होती.

Dev manus serial news latest

गेल्या काही आठवड्यापासून मालिकेत अनेक बदल घडून आल्याने बरेच ट्विस्ट आलेले पाहायला मिळाले. सध्या मालिकेत अजित कुमारला निर्दोष मुक्तता करण्यात आलेले दाखविण्यात आले. तसेच, चंदा नावाच्या पात्राच्या आगमन झाले असून व तिच्या येण्याने देवी सिंग चांगलाच बिथरलेला दिसून येत आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *