Dilip kumar death news

दिलीप कुमार यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीसह जगभरातील त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गेल्या महिन्यात सुद्धा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.दिलीप कुमार यांना रविवारी 6 जून सकाळी मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं.

Dilip kumar death news

दिलीप कुमार यांच्या ट्वीटर हँडलवरुन सकाळी आठ वाजता त्यांचे निधन झाले असल्याची माहिती जाहीर करण्यात आली. त्याचे कौटुंबिक मित्र फैजल फारुकी यांनी ही माहिती दिली.

Dilip kumar death news

ज्वार भाटा’ हा त्यांचा पहिला चित्रपट 1944 मध्ये प्रदर्शित झाला होता. 1998 मध्ये आलेल्या किला चित्रपटातली भूमिका त्यांची अखेरची भूमिका ठरली. मुघल-ए-आजम, नया दौर, देवदास, या चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. भारतातच नाही तर पाकिस्तानातही त्यांचे असंख्य चाहते आहेत.दिलीप कुमार सायरा बानो यांच्याबरोबर 11 ऑक्टोबर 1966 ला झाला. तेव्हा सायरा फक्त 25 वर्षांच्या होत्या तर दिलीप कुमारांचं वय 44 वर्षं होतं.

Dilip kumar death news

त्यांना पद्मविभूषण हा भारताचा नागरी सन्मान आणि पाकिस्तानचा ‘निशान-ए-इम्तिआज’ या पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आलं आहे. 2000-2006 या काळात त्यांनी राज्यसभेत खासदारपदही भूषवलं आहे.

Dilip kumar death news

यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. दिलीप कुमार यांच्या जाण्याने कलाविश्वाचं मोठे नुकसान झाल्याचंही ते म्हणाले.

अमिताभ बच्चन व इतर कलाकारांनी देखील दिलीपकुमार याना सोशल मीडिया वरून श्रद्धांजली वाहिली

 

 

दिलीपकुमार याना मर्दमराठी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.