स्टार प्रवाह वाहिनीवर चालू असलेल्या “मुलगी झाली हो” या मालिकेने लाखो प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेतील उत्तम कथानक व कलाकारांचा उत्तम अभिनय या कारणाने ही मालिका गेल्या काही काळापासून टीआरपी मध्ये पहिल्या स्थानी पाहायला मिळत असते. या मालिकेत माऊची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या सुभाष पुगावकर मूकबधीर मुलीचे पात्र उत्तमरित्या साकारले आहे.

Divya subhash biography

दिव्याचा जन्म 21 जुलै 1996 रोजी झाला होता. ती मुळची रायगड जिल्यातील माणगाव येथील आहे व ती सध्या मुंबई येथे वास्तव्यास आहे. दिव्याचे शालेय शिक्षण देखील मुंबई येथेच झाले आहे. मालिकेत माऊ नामक मुक्या मुलीचे पात्र साकारणाऱ्या दिव्याने तिच्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत. मालिकेत जरी दिव्या मुकी असली तरी खऱ्या आयुष्यात तिचा आवाज खूपच गोड आहे.

Divya subhash biography

दिव्याचा आवाज खूप कमी प्रेक्षकांनी ऐकला असेल. दिव्याचा काही काळापूर्वी “यारी तुझी माझी” हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार होता. त्या चित्रपटाच्या प्रमोशन वेळी दिव्याने काही शब्द बोलली होती. दिव्याचा आवाज ऐकून प्रेक्षकवर्ग देखील तिच्या प्रेमात पडतील, हे नक्की. मालिकेत माऊचा आवाज कधी ऐकायला मिळेल याचीच फॅन्स वाट पाहत असतात.

“मुलगी झाली हो” मालिकेत शौनक व सिद्धांत हे माऊला मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केले. शेवटी सिद्धांत व माऊचे लग्न ठरले होते. परंतु, सिद्धांत ने हे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या गोष्टीचा राग मनात धरून विलास पाटलांनी शौनकला धक्का दिला व त्यामध्ये शौनक जोरात डोक्यावर पडला आहे. आता पुढे मालिकेत काय होणार हे पाहणे मनोरंजक ठरेल.

Divya

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *