कुटुंब म्हटल्यास भावंडामधील आपापसातील वादविवाद होणे या गोष्टी साधारण असतात. सर्वच घरात छोट्या छोट्या गोष्टीतून भावंडांमध्ये वाद होताना दिसून येत असतात. मराठी अभिनय क्षेत्रातील लोकप्रिय बहिणी असणाऱ्या गौतमी देशपांडे व मृण्मयी देशपांडे या दोघी मधील एक गंमतीशीर वाद फॅन्ससमोर आला आहे. स्वतः मोठी बहीण मृण्मयीने व्हिडिओ पोस्ट करून गौतमी बद्दल राग व्यक्त केला आहे.

Gautam Mrunmayi latest video

पुणे येथे राहणाऱ्या मृण्मयी व गौतमी या किती गुणवान कलाकार आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. अभिनयासोबतच या दोघींमध्ये गायनाची देखील तितकीच आवड आहे. मोठी बहीण मृण्मयी पाठोपाठ छोटी बहिण गौतमीने देखील माझा होशील ना? मालिकेद्वारे दमदार पदार्पण केले आहे. परंतु, मृण्मयीने आज एक व्हिडिओ शेयर करीत गौतमी ही चोर असल्याचे फॅन्सच्या निदर्शनास आणून दिले.

व्हिडिओ मध्ये मृण्मयी म्हणाली, “मी आज मोठ्या बहिणीची व्यथा मांडण्यासाठी हा व्हिडिओ शूट करतेय. मी माहेरी असून गौतमीचे कपाट उघडून पाहिले तर आत्ता पर्यंतचे माझे हरवलेले सर्व कपडे मला त्यात सापडले. त्या कपड्याचे बोळे करून लपवून ठेवले होते. मी जेंव्हा पण तिला माझ्या कपड्याबाबतीत विचारले असता, ‘नाही ताई, नाही ताई’ असे उत्तर देत गेली. तुम्ही ज्या सईवर प्रेम करता, ती सई चोर आहे.”

Gautam Mrunmayi latest video

मृण्मयीने शेयर केलेल्या गमतीशीर रागाच्या व्हिडिओला अनेक कलाकारांनी रिप्लाय दिला. तसेच, गौतमी देशपांडेने देखील या पोस्ट वर “खोटारडी, तू चोर” अशी कमेंट केली. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने तर गौतमीची बाजू घेत, “ते कपडे गौत्यावर जास्त छान दिसतात आता” अशी कमेंट केली. काहीही असो परंतु मृण्मयीच्या या प्रेमळ भांडणाचा नेटकरी आनंद घेताना दिसून येत आहेत.

Gautam Mrunmayi latest video

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *