एखाद्या व्यक्तीला प्रेमात धोका मिळाल्यास ती व्यक्ती कोणत्या स्तराला जाऊ शकते याचे एक उदाहरण समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर एका मुलीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसून येत आहे. या मुलीला तिच्या प्रियकराकडून धोका मिळाला व त्यानंतर तिने जे काही करण्याचा प्रयत्न केली ते फक्त एक सच्चा प्रेमीच करू शकतो. या घटनेची चर्चा संपूर्ण देशभरात होत आहे.

Hoshingabad MP babu video

व्हायरल व्हिडिओ मधील ही घटना मध्यप्रदेश येथील होशंगाबाद येथील आहे. व्हिडिओ मधील मुलगी व तिचा प्रियकर भोपाळच्या एका कंपनी मध्ये काही वर्षांपासून काम करीत होते. नंतर ते दोघे 3 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते. मुलीच्या बॉयफ्रेंड तिला कसलीच कल्पना न देता गुपचूप लग्न करण्याचा प्रयत्न करीत होता. लग्नमंडपात तो मुलगा लग्न करीत असतानाच त्याची गर्लफ्रेंड बाहेर आली.

Hoshingabad MP babu video

लग्नमंडपाच्या गेटवर उभे राहून या मुलीने असा धिंगाणा घातला की पाहणाऱ्यांना हे समजायला जराही वेळ लागला नाही की हे प्रेमाचे प्रकरण आहे. ती मुलगी आत जाण्यासाठी अथक प्रयत्न करताना दिसून आली, परंतु, तिला कोणीही आत जाऊ दिले नाही. तब्बल अर्धा तास या मुलीने “बाबू” “बाबू” असे ओरडत गेटजवळ उभी राहिली. परंतु, या मुलीचे सर्व प्रयत्न निरर्थक ठरले.

हा सर्व प्रकार पाहून स्थानिकांनी पोलिसांशी संपर्क साधला व महिला पोलिस तिथे उपस्थित झाल्या. पोलिसांनी त्या मुलीला गाडीत बसवून पोलीस स्टेशनला नेलं. या सर्व प्रकाराची माहिती विचारल्यानंतर त्या तरुणीला तक्रार दाखल करणार का असे विचारण्यात आले. परंतु, तिने त्यावेळी तक्रार दाखल करण्यास नकार दिला व नंतर ती घरी परत गेली. परंतु, त्या व्हायरल व्हिडिओ मुळे अनेक प्रेमवीरांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *