मराठी मालिकांमध्ये सध्या लोकप्रिय असलेली “देवमाणूस” या मालिकेत एका मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. या मालिकेत आता “चंदा” नावाचे पात्र दाखल झाले असून मालिकेला वेगळे वळण मिळाले आहे. चंदा ही मालिकेत बोगस डॉक्टर असणाऱ्या देवी सिंगला चांगलाच धडा शिकवताना दिसून येत आहे. याच चंदाची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधुरी पवार ही चांगलेच चर्चेत आली आहे.

madhuri pawar new dance video

माधुरी पवारचा जन्म सातारा शहरात 21 मार्च, 1993 रोजी झाला आहे. तिचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण देखील सातारा येथेच पूर्ण झाले. अगोदरपासूनच अभिनयाची आवड असलेल्या माधुरीला टिकटॉक मुळे अधिक लोकप्रियता मिळाली. टिकटॉकवर तीचे लाखो फॉलोअर्स होते व ती युवा पिढीची आकर्षण बनली होती. अभिनयासोबतच माधुरी डान्स मध्ये निपुण असलेल्या माधुरीचा एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसून येत आहे.

माधुरी ही या अगोदरही टेलिव्हिजन वर आली असून ती झी युवा वरील “अप्सरा आली” या डान्स शो मध्ये सहभाग घेतला होता. 2019 मध्ये पार पडलेल्या या शोची ती विजेती देखील झाली होती. त्यामुळे ती अभिनयासोबतच एक उत्तम डान्सर देखील आहे. सध्या इंस्टाग्राम वर देखील रील्स मधून ती तिच्या डान्सचे जलवे दाखवीत असते.

madhuri pawar new dance video
काही दिवसांपूर्वी माधुरीला आपण तुझ्यात जीव रंगला मालिकेत नंदिताची भूमिका साकारताना पाहिलं होतं. अभिनेत्री धनश्री काडगावकर ने मालिका सोडल्यानंतर माधुरीने नंदिताचे पात्र उत्तमरीत्या साकारले होते. आता देवमाणूस या मालिकेत ती चंदाची भूमिका साकारून देवी सिंगचे खरे रूप जगासमोर आणताना दिसणार आहे.

madhuri pawar new dance video
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *