महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती झाली आहे. काही ठिकाणी जवळपास सर्वच घरे पाण्याखाली गेले आहेत, तर काही ठिकाणी कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे. आता पाऊस काही प्रमाणात कमी होत चालल्याने बचावकार्य व मदतकार्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये काही मराठी कलाकार देखील मदतीचे आवाहन करताना दिसून येत आहेत.

Mrunmayee deshpande new news
कोकण भागात व पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना या महापुराचा जास्त करून फटका बसला आहे. अनेकजण बेघर झाले आहेत, तर काही कुटुंबाचे बरेच नुकसान झाले आहे. चिपळूण शहरात या पुराचा जास्त फटका बसला आहे. सध्या त्या भागात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत असून मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने फॅन्ससाठी एक व्हिडिओ शेयर केला आहे.

मृण्मयीने व्हिडिओ द्वारे असे म्हटली, “व्हिडिओ करण्यामागचे कारण असं आहे की चिपळूण मधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोकण प्रांत पूर्णपणे पुराने आणि पावसाने झोडपला गेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती त्यांनी मदतीसाठी काही लोकांची नावे दिली आहेत. हा व्हिडिओ चिपळूण मधील लोकांकडे पोहचवण्यासाठी मदत करा”

“व्हिडिओ पोस्ट करण्यामागे हेच कारण आहे कृपया काळजी घ्या. कॅप्शन मध्ये शेयर केलेल्या लोकांपर्यंत पोहचा. चिपळूणकरांनो काळजी घ्या, आम्ही सगळे कलाकार तुमच्या पाठीशी आहोत.” अशा शब्दात मृण्मयीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या मृण्मयी ही झी मराठी वरील सारेगमप लिटिल चॅम्प मध्ये सूत्र संचालिका करताना दिसून येत आहे. मृण्मयी सोबत काही मराठी कलाकार देखील मदतीचे आवाहन करताना दिसत आहेत.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *