स्टार प्रवाह वाहिनीवरील “मुलगी झाली हो” या मालिकेने लाखो प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. याच कारणाने ही मालिका सातत्याने टीआरपी मध्ये शीर्ष स्थानी पाहायला मिळत असते. या मालिकेत माऊची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या सुभाष पुगावकर हीचा आज वाढदिवस आहे. मालिकेची मुख्य अभिनेत्री असलेल्या दिव्याचा वाढदिवस आज मालिकेच्या सेटवर साजरा करण्यात आला.

Mulagi jhali ho mau birthday video

21 जुलै 1996 रोजी दिव्याचा जन्म झाला होता. ती मुळची रायगड जिल्यातील माणगाव येथील असली तरी ती सध्या मुंबई येथे राहते. दिव्याचे शालेय शिक्षण देखील मुंबई इथेच झाले होते. मालिकेत मुक्या मुलीचे पात्र साकारणाऱ्या दिव्याने तिच्या अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत. आज सहकलाकारांच्या उपस्थितीत माऊचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

या वाढदिवसाला मालिकेत शौनकची भूमिका साकारणारा अभिनेता योगेश सोहोनी याने दिव्याला तिची कार्टून फोटो असलेली फ्रेम गिफ्ट दिली आहे. त्या फ्रेम मद्ये दिव्या त्याला ज्या नावाने हाक मारते ती नावे टाकली आहेत. तसेच योगेशने सोशल मीडियावर पोस्ट करताना एक मजेशीर कॅप्शन टाकले आहे. “मी तुझा लिओ तू माझी केट, कोणी कितीही आडवं आलं तरी सिरियल मध्ये आपलंच लग्न होणार थेट.”

 

दिव्या पुगावकर ही अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मुंबईची सुकन्या या फॅशन शो ची विजेती ठरली होती. नंतर तिने प्रेम तुझा रंग कसा या मालिकेतून पदार्पण केले होते. स्टार प्रवाह वाहिनीवरील विठू माउली या मालिकेत “चंद्रभागा” या भूमिकेत दिसून आली होती. मुलगी झाली हो मालिकेत दिव्याचा साखरपुडा सिद्धांत सोबत झाला असून मालिकेत पुढे काही ट्विस्ट येणार का? हे पाहणे मनोरंजक ठरेल.

Mulagi jhali ho mau birthday video

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *