टेलिव्हिजन क्षेत्रात जेंव्हा पण लोकप्रिय मालिकांचे नावे घेतली जाईल, त्यामध्ये “पवित्र रिश्ता” या मालिकेचे नाव त्या यादीत नक्कीच राहील. या हिंदी मालिकेने एकेकाळी घराघरातून प्रेक्षकांचे प्रेम मिळविले होते. या मालिकेतील अर्चना(अंकिता लोखंडे) व मानव(सुशांत सिंग राजपूत) या जोडीला प्रेक्षकांची खूपच जास्त पसंती मिळाली होती. म्हणूनच या मालिकेने तब्बल 5 वर्ष टेलिव्हिजन वर राज्य केले होते.

Pavitra Rishta 2

 

गेल्या वर्षी सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याचे निधन झाल्यानंतर “पवित्र रिश्ता” या मालिकेची सर्वांनी आठवण काढली. कारण सुशांतच्या अभिनयाची खरी सुरुवात पवित्र रिश्ता या मालिकेपासूनच झाली होती. याच कारणाने अनेकांनी पवित्र रिश्ताचे दुसरे सिझन सुरू करण्याची मागणी केली. त्यामुळेच पवित्र रिश्ता मालिकेच्या दुसऱ्या सीझनच्या शूटिंगची सुरुवात झाली असून यात काही जुने तर काही नवीन कलाकार दिसून येणार आहेत.

 

पवित्र रिश्ता मालिकेच्या नवीन सीझन मध्ये अर्चनाच्या भूमिकेत अंकिता लोखंडे हीच असून मानवची भूमिका शाहीर शेख हा अभिनेता साकारणार आहे. तसेच, या मालिकेसाठी आता आणखीन एक मराठमोळा चेहरा फॅन्ससमोर दिसून येणार आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावे ही या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसून येणार आहे. अभिज्ञासाठी ही एक मोठी संधी आहे.

New pavitra Rishta serial news

खुलता कळी खुलेना, तुला पाहते रे या मराठी मालिकांमधून लोकप्रियता मिळविणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे हीने नुकतेच बावरा दिल मालिकेद्वारे हिंदी मध्ये पदार्पण केले होते. आता परत एकदा ती नवीन भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. तसेच, या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या देखील दिसून येणार आहेत.

New pavitra Rishta serial news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *