कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉस मधील स्पर्धक राहुल वैद्य या कलाकाराचा आज विवाह सोहळा पार पडला. अभिनेता व गायक असलेला मराठमोळ्या राहुल वैद्य याचे लग्न अभिनेत्री दिशा परमार हिच्यासोबत झाले. या दोघांचा विवाहसोहळा मुंबई येथील द ग्रँड हयात येथे धूमधडाक्यात पार पडला.

Rahul vaidya marriage photos

 

राहुल वैद्य हा मागील वर्षी झालेल्या बिग बॉस 14 चा स्पर्धक होता व तो त्या सीझनचा उपविजेता देखील ठरला होता. या सिझन मध्ये दिशा जेंव्हा राहुलला सपोर्ट करण्यासाठी शो मध्ये आली होती, तेंव्हा राहुल वैद्य याने हा दिशाला टिव्ही वरच प्रपोज केलं होतं. दोघांच्या लग्नातील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसून येत आहे.

 

आज लग्नासोबतच दोघांचा साखरपुडा देखील पार पडला. त्यात राहुल याने गुडघ्यावर बसून दिशाला अंगठी घातली. राहुल हा दिशावर किती प्रेम करतो हे त्याच्या फॅन्सना माहितीच आहे. नंतर दोघांनी लग्नगाठ बांधून 7 जन्माची वचने घेतली. दोघेही लग्नातील कपड्यात खूपच सुंदर दिसून येत होते.

 

या लग्नसोहळ्याला अनेक सेलेब्रिटी व दोघांचे मित्र परिवार उपस्थित होते. लग्न सोहळा सुरू होण्यापूर्वी राहुलने वक्रतुंड महाकाय हे मंत्र गाऊन वातावरण प्रफुल्लित केले व त्यानंतर ज्यावेळी पत्रकारांसमोर राहुलला नाव घेण्यास सांगितले त्यावेळी त्याने आपल्या हटके शैलीत नाव घेऊन फॅन्सची मने जिंकली.

Rahul vaidya marriage photos

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *