बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मागील काही वर्षापासून अनेक अवैध गोष्टी समोर येताना दिसून येत आहेत. ड्रग्स, मीटू, कास्टिंग काऊच, नेपोटिस्म अशा अनेक घटनांमुळे बॉलिवूडची प्रतिमा मलिन झाली होती. आता बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला एका धक्कादायक कारणाने अटक करण्यात आली आहे.

Raj kendra arrest news marathi

नेहमीच वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत असलेला उद्योजक राज कुंद्रा काही वेळापूर्वी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. चित्रपट बनविणाऱ्या अनेक व्यक्तींची गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती. त्यानुसार राज कुंद्राची आज चौकशी करण्यात आली. राज कुंद्रा याला अश्लील चित्रपटाची शूटिंग केल्या प्रकरणी अटक करण्यात आली असल्याचे समजते.

 

राज कुंद्रा याच्यावर फेब्रुवारी 2020 मध्ये या संबंधी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीत राज कुंद्रा हा मुला मुलींचे अश्लील चित्रपट बनवून मोबाईल ॲप वर पोस्ट करीत असल्याचे उघड झाले आहे. जवळपास 7 ते 8 तास कसून चौकशी केल्यानंतर व पोलिसांकडे सबळ पुरावे असल्याने राज कुंद्राला अटक करावी लागली. राज कुंद्राच्या या कृत्याने परत एकदा बॉलिवुड मध्ये खळबळ माजली आहे.

Raj kendra arrest news marathi

खरे तर राज कुंद्रा याच्यावर या अगोदर देखील गंभीर आरोप लागले आहेत. उद्योग पती सचिन जोशी व राज कुंद्रा यांच्यात 2014 मध्ये देवाण घेवाणीवरून मोठा वाद झाला होता व त्यासाठी सचिन जोशी यांनी 15 दिवसापूर्वीच फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. तसेच, फिक्सिंग मुळे देखील आयपीएल मधील राजस्थान रॉयल्स संघाचा मालकी हक्क काढून घेण्यात आला होता.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *