आज दिनांक 7 जुलै रोजी बॉलिवूडचा ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. आपल्या अभिनयाच्या जोरावर तब्बल 5 दशके गाजविणारे अभिनेते दिलीप कुमार यांच्या जाण्याने बॉलिवूडने एक महानायक गमवला आहे. स्वर्गीय दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसुफ खान हे होते. त्यांचे दिलीप कुमार हे नाव कसे झाले, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

Real name of dilip kumar

 

खरे तर दिलीप कुमार यांच्या नावात बदल करण्याची गोष्ट ही हिंदी चित्रपटाशी निगडित आहे. दिलीप कुमार यांचे वडील फळ विकण्याचे काम करीत होते. एके दिवशी दिलीप कुमार यांचे वडीलासोबत भांडण झाले व ते रागात पुण्याला निघून गेले. पुण्यात त्यांनी एका आर्मी कॅम्प मध्ये सँडविच विकण्याचे काम केले. तिथे त्यांचे काम चांगले चालू असतानाच त्यांना काम सोडून अचानक मुंबईला यावे लागले.

 

मुंबईत आल्यानंतर डॉ. मसानी यांनी दिलीप कुमारला देविका राणी कडे घेऊन गेले. देविका राणी या बॉम्बे टॉकिजच्या मालकीण होत्या. दिलीप कुमार खरे तर तिकडे जाणार नव्हते परंतु, चित्रपट पाहण्याच्या बहाण्याने ते गेले. तिथे गेल्यास देविका यांनी दिलीप कुमार यांना महिना 1250 रुपये प्रमाणे नौकरी दिली. देविका यांनी दिलीप कुमारच्या चेहऱ्याला पाहून चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. मात्र देविका यांनी मोहम्मद युसुफ समोर नाव बदलण्याची अट ठेवली.

Real name of dilip kumar

देविका राणी यांना युसुफ हा एक रोमँटिक हिरो म्हणून लोकप्रिय व्हावे व त्याप्रमाणे त्याचे एक स्क्रीन साठी वेगळे नाव असावे. युसुफला पाहताच देविका यांच्या डोक्यात पाहिले नाव दिलीप आले व त्यानंतर त्यांचे नाव दिलीप कुमार ठेवण्यात आले. वयाच्या 22 वर्षी दिलीप कुमार यांना पहिला चित्रपट ज्वार भाटा हा चित्रपट मिळाला. तो चित्रपट काही जास्त चालला नाही परंतु, त्यानंतर दिलीप कुमार हे नाव कायम सर्वत्र लोकप्रिय झाले.

Dilip kumar death news

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *