सध्याच्या युगात एखाद्या व्यक्तीचे नशीब पलटायला जास्त वेळ लागत नसते. यापूर्वी आपण सोशल मीडियावर एखाद्या व्हिडिओद्वारे काही लोक रातोरात स्टार झालेले पाहिले असतील. काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका मुलाने गायलेले “बचपन का प्यार” हे गाणे प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहे. त्या व्हायरल मुलाबाबतीत एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

Sahadev bachpan ka pyaar song

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील उर्मापाल या छोट्याश्या गावातील सहदेव नामक मुलाने सहजच शाळेत एक गाणे गायले. ते गाणे आता सोशल मीडियावर सर्वत्र ऐकायला मिळत आहे. खूप कमी लोकांना माहिती असेल की सहदेवने तो व्हायरल व्हिडिओ 2 वर्षापूर्वी गायला होता. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी चालू असताना सहदेवने हे गाणे गायले होते. 2 वर्षानंतर हे गाणे व्हायरल होताना दिसून येत आहे.

 

व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सहदेवचे नशीबच पलटले असून बॉलिवुडचा लोकप्रिय गायक व रॅपर बादशाह याने सहदेवला एक ऑफर दिली आहे. सहदेवचे गाणे ऐकून बादशाहने त्याला चंदीगडला बोलवुन एक गाण्याची आहे. त्यासाठी बादशाहने चंदीगडच्या फ्लाईटचे तिकीटे पाठविली व तो नातेवाईकासोबत चंदीगड येथे गेला देखील आहे.

 

अत्यंत गरीब कुटुंबातील असलेला सहदेव आता 12 वर्षाचा झाला आहे. त्याचे वडील शेतकरी असून त्यांच्या घरी मोबाईल व टिव्ही काहीच नाही. मोठे होवुन गायक बनण्याचे स्वप्न घेऊन उतरलेल्या सहदेवचे रातोरात स्वप्न पूर्ण होत आहे. त्याच्या गाण्यावर इंस्टाग्रामवर तब्बल 15 हजारच्या जवळ रील्स व्हिडिओ बनले आहेत. आता बादशाह सोबतचे त्याचे येणारे गाणे किती चालेल हे येणारा काळच सांगेल.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *