गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवुड मधून अनेक अवैध गोष्टी समोर येताना दिसून येत आहेत. ड्रग्स, मीटू, कास्टिंग काऊच, नेपोटिस्म अशा अनेक घटनांमुळे बॉलिवूडवर लोकांचा आक्रोश वाढताना दिसून येत होता. त्यातच 2 दिवसांपूर्वी बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला एका अश्लील चित्रपट बनविण्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे.

Raj kendra arrest news marathi

उद्योजक राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. चित्रपट बनविणाऱ्या अनेक व्यक्तींची गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती. त्यानुसार राज कुंद्राची चौकशी करण्यात आली. राज कुंद्रा याला अश्लील चित्रपटाची शूटिंग करून ॲप वर प्रदर्शित केल्या प्रकरणी अटक करण्यात आली. या सर्व प्रकरणामुळे शिल्पा शेट्टी हीने तिच्या करियर संदर्भात एक निर्णय घेतला आहे.

 

 

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सोनी टिव्ही वरील सुपर डान्सर मध्ये जजच्या रुपात दिसून येत होती. पती राज कुंद्रा याला अटक झाल्या नंतर ती येत्या काही भागात शो मध्ये दिसणार नाही. त्यामुळेच तिने सोमवार व मंगळवारी होणाऱ्या या आठवड्यातील शूटिंगला देखील उपस्थित राहिली नाही. त्यामुळे ती या शोच्या सिझन मध्ये परत दिसणार नाही याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Raj kendra arrest news marathi

राज कुंद्रा याच्यावर फेब्रुवारी 2020 मध्ये या संबंधी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीत राज कुंद्रा हा मुला मुलींचे अश्लील चित्रपट बनवून मोबाईल ॲप वर पोस्ट करीत असल्याचे उघड झाले आहे. जवळपास 7 ते 8 तास कसून चौकशी केल्यानंतर व पोलिसांकडे सबळ पुरावे असल्याने राज कुंद्राला अटक करावी लागली. राज कुंद्राच्या या कृत्याने परत एकदा बॉलिवुड मध्ये खळबळ माजली आहे.

Shilpa shetty decision on Raj kundra

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *