जगभरात आपण अनेकदा काही अनोखे लग्नसोहळे घडलेले पाहायला मिळतात. त्यातच गेल्या काही दिवसांपासून नाशिक येथील तृतीयपंथी शिवलक्ष्मी व संजय यांच्या लग्नाची सोशल मीडियावर खूपच चर्चा चालू होती. आता या दोघांनी त्यांच्या प्रेमाची सुरुवात व त्यांना काय काय अडचणी आल्या तर शेयर केले आहे.

Shiv laxmi sanjay zalte
नाशिकच्या येवला तालुक्यातील मातुळठाण येथील संजय झालटे या युवकाने मनमाड येथे राहणारी तृतीयपंथी शिवलक्ष्मी हिला सर्वप्रथम सर्वप्रथम टिकटॉक वर पाहिले. संजय शिवलक्ष्मीला दीड वर्षापासून सोशल मीडियावर मेसेजेस करीत होता. दीड वर्षापासून मेसेज करून माझी विचारपूस करणारा हा व्यक्ती नक्की कोण आहे, हा प्रश्न शिवलक्ष्मी हिला पडला.

Shiv laxmi sanjay zalte
अचानक एक दिवस शिवलक्ष्मीने तिच्या चेल्याना संजय बाबतीत सांगितले व 10 फेब्रुवारी 2021 रोजीच्या शिवलक्ष्मीने संजयला व्हिडिओ कॉल केला. या दोघांनी रात्री 11 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत व्हिडिओ कॉल मध्ये गप्पा मारल्या. दुसऱ्याच दिवशी शिवलक्ष्मीने संजयला घरी जेवणाचे आमंत्रण दिले व त्यानुसार संजय संध्याकाळी घरी जेवायला आला.

जेवताना संजयने शिवलक्ष्मीला घास भरवला व ते पाहून लक्ष्मीला कोणीतरी जवळचा व्यक्ती भेटल्याचे जाणविले. नंतर शिवलक्ष्मीने देखील संजयला घास भरवला. या पहिल्या भेटीत जेवण झाले तेंव्हा संजय ने शिवलक्ष्मीचा हात धरून पाण्याने हात धुतले. इथूनच दोघांच्या प्रेमाचा बहर फुलाला. नंतर दोघांनी त्या रात्री एकत्र गप्पा मारीत वेळ घालविला.

Shiv laxmi sanjay zalte
व्हॅलेंटाईन डे दिवशी संजयने शिवलक्ष्मीला लग्नाची मागणी घातली. परंतु, शिवलक्ष्मीने संजयला अगोदर घरच्यांची परवानगी घे, मगच मी तुला होकार देईन असे म्हटले. त्यानुसार संजय यांनी घरच्यांची परवानगी घेतली व दोघांनी 15 जून रोजी दोन्ही कुटुंबासमोर मंदिरात लग्न केले. या दोघांनी लग्न करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. संजय व शिवलक्ष्मीला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

Shiv laxmi sanjay zalte

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *