कलर्स मराठी वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या “शुभमंगल ऑनलाईन” या मालिकेतील अभिनेता सुयश टिळक याचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे. दिनांक 6 जून रोजी पुण्यातील सुयशच्या राहत्या घरी साखरपुडा संपन्न झाला. साखरपुड्याचे फोटो पोस्ट करीत सुयशने फॅन्सना आनंदाचा धक्काच दिला आहे.

Suyash tilak latest
Credit: Parag Sawant Films

सुयश टिळक याने ज्या अभिनेत्री सोबत साखरपुडा केला आहे त्या अभिनेत्रीचे नाव आयुषी भावे आहे. आज दिनांक 7 जून रोजी आयुषीचा वाढदिवस असून सुयशने तिला शुभेच्छा देत सोबतच साखरपुड्याची बातमी फॅन्सला दिली. “एक अशी महिला जिने माझ्या आयुष्यात सर्व काही सुंदर बनविले. हॅप्पी बर्थडे लव्ह” अशा शुभेच्छा देताना सोबत अंगुठीचे स्टिकर दाखविले.

“तुझ्या सोबत माझे जीवन पूर्ण आहे आणि मी खूप नशीबवान व्यक्ती आहे ज्याला इतकी छान पत्नी मिळाली. सांगताना आनंद होत आहे की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आता आम्ही अधिकृतरीत्या एकत्र आलो असून नवीन प्रवासाची सुरुवात एकत्र करणार आहोत” अशा शब्दात सुयशने आयुषी सोबतच्या नात्याची सुरुवात झाले असल्याचे फॅन्सना पोस्टद्वारे कळविले.

सुयशच्या या पोस्टला अनेक मराठी कलाकारांनी शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या. सुयशची होणारी पत्नी आयुषी भावे हीला 2018 मध्ये श्रावण क्वीनचा किताब मिळाला होता. तसेच, ती झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीन या शो मध्ये देखील दिसून आली होती. गेले काही महिने आपल्या नात्याविषयी चुप्पी ठेवल्यानंतर आता अखेर सुयशने त्याच्या प्रेमाचा खुलासा केला आहे. सुयश व आयुषीला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

Suyash tilak engagement photos
Credit: Parag Sawant Films

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *