Zee marathi new serial promo

गेल्या काही महिन्यांपासून झी मराठी वाहिनीवरील मालिकांचा टीआरपी कमी होताना दिसून आला. काही महिन्यांपूर्वी माझ्या नवऱ्याची बायको व तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकांनी निरोप घेतला व काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. नवीन मालिकांच्या स्टोरी मध्ये काहीच नावीन्य नसल्याने याचा फटका झी मराठी वाहिनीच्या मालिकांना बसला. परंतु, आता झी मराठी वाहिनीवर मोठा बदल होणार असून 3 नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

 

गेल्या आठवड्याभरात झी मराठीने 3 नवीन मालिकांचे प्रोमो प्रसारित केले आहेत. “ती परत आलीये”, “माझी तुझी रेशीमगाठ”, “मन झालं बाजिंद” या ती मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यापैकी “ती परत आलीये” ही मालिका येत्या 16 ऑगस्ट पासून रात्री 10.30 वाजता दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांना “देवमाणूस” मालिका बंद होणार का हा प्रश्न पडला होता. परंतु, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवमाणूस मालिका बंद होणार नसून त्या मालिकेचा वेळ बदलण्यात येणार असल्याचे समजते.

3 मालिकांचे प्रोमो आल्याने नक्की कोणत्या मालिका निरोप घेऊ शकतात ते जाणून घेऊयात. झी मराठीवरील अग्गबाई सूनबाई या मालिकेला सर्वात जास्त नकारात्मक प्रतिक्रिया मिळताना दिसून येतात. प्रेक्षकांच्या नापसंतीस उतरलेली ही मालिका ऑगस्ट महिन्याच्या मध्यावतीत निरोप घेताना दिसू शकते. या मालिकेचे कथानक “माझ्या नवऱ्याची बायको” मालिके सारखे असल्याचे प्रेक्षकांकडून बोलले जाते.

 

झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होणारी “कारभारी लयभारी” ही मालिका देखील बंद होणार असल्याचे समजते. लेखक व दिग्दर्शक असलेले तेजपाल वाघ यांची “मन झालं बाजिंद” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच, देवमाणूस मालिकेचा वेळ 11 ऐवजी 8.30 वाजता करण्यात आला तर झी मराठीला आणखीन एक मालिका बंद करावी लागणार. अग्गबाई सूनबाई सोबत तिसरी मालिका “येऊ कशी तशी मी नांदायला” ही देखील बंद होवू शकते.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *