स्टार प्रवाह वाहिनीची सर्वात जास्त लोकप्रिय होत असलेली आई कुठे काय करते? ही मालिका सध्या महत्वाच्या वळणावर येऊन थांबली आहे. मालिकेचे मुख्य पात्र अरुंधती व तिचा नवरा अनिरुद्ध यांच्यात घटस्फोट झाल्याचे मालिकेत दाखविण्यात येत आहे. त्यामुळे अरुंधती मुलांना सोडून माहेरी निघून जातानाचे दाखविण्यात आले.

Aai kuthe kay karte

 

मालिकेत अरुंधती घर सोडून जातानाचा तो सीन इतका भावनिक होता की एका आज्जीला देखील तो सीन पाहताना अश्रू आवरता आले नाही. या आज्जीचे नाव द्रोपदाबाई पोकळे पाटील असून त्या पुणे जिल्ह्यातील शिवणे गावात राहतात. आई कुठे काय करते मालिकेला अगदी पहिल्या एपिसोड्स पासून पाहणाऱ्या या 80 वर्षीय आज्जीला तो सीन पाहताच अश्रू आवरता आले नाही.

 

हा आज्जीचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की स्वतः अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुळकर यांनी पोस्ट केला. आज्जी ने नंतर एका व्हिडिओ मध्ये म्हटले, “इतक्या वर्षांचा संसार करून अरुंधती घर सोडून गेल्याने मला त्याचे खूप दुःख झाले. अरुंधती ने माझा व्हिडिओ शेयर केला हे पाहून खूप आनंद होत आहे. अरुंधती सर्व टीमला माझा आशीर्वाद.”

Aai kuthe kay karte fans viral

आई कुठे काय करते मालिकेचे दिग्दर्शन व कथानक इतक्या उत्तमरीत्या प्रेक्षकांसमोर मांडण्यात येत असल्यानेच प्रेक्षकांकडून या मालिकेला भरभरून प्रेम मिळत असते. सध्या मालिकेत अनिरुद्ध हा संजनामुळे अरुंधती पासून विभक्त होत असून येणाऱ्या काही भागात आणखीन काही ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. काहीही असो पण या आज्जीच्या व्हिडिओ ने हे मात्र सिद्ध झाले आहे की, ही मालिका प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनला आहे.

Aai kuthe kay karte fans viral

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *