गेल्या वर्षभरात मराठी अभिनय क्षेत्रातील अनेक कलाकारांच्या लग्नाचा बार उडालेला आपण पाहिलं. मानसी नाईक, मिताली मयेकर, सिद्धार्थ चांदेकर, अभिज्ञा भावे, सोनाली कुलकर्णी अशा अनेक लोकप्रिय कलाकारांनी लग्नगाठ बांधली. त्यामध्ये मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे हिचा देखील 6 जानेवारी 2021 रोजी विवाह झाला होता.

Abhidnya bhave latest news

खुलता कळी खुलेना, तुला पाहते रे मालिकेतून लोकप्रियता मिळविणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे हीचा विवाह मेहुल पै या व्यक्तीसोबत झाला. लग्नानंतर ती पहिल्यांदाच सर्व सण साजरा करताना दिसून येत असून ती प्रत्येक सणाला तिच्यामद्ये उत्साह दिसून येत आहे. नववधू साठी प्रिय असणारा मंगळागौर हा सण अभिज्ञाने तिचे कुटुंबातील महिला व मैत्रिणीसोबत साजरा केला.

मंगळागौर हे महिलांसाठी व्रत असते व ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नववधूने धरायला पाहिजे. या दिवशी नव विवाहिता या अन्य महिलांसोबत पूजा करून धमाल करताना दिसतात. अभिनेत्री अभिज्ञा भावे हीने मंगळागौर साजरा करण्यासाठी काही अभिनेत्रींना देखील बोलविले होत. त्यामध्ये तिच्या जवळच्या मैत्रिणी रेश्मा शिंदे, अनुजा साठे, दीप्ती लेले या अभिनेत्री होत्या.

Abhidnya bhave latest news

अभिज्ञाचा मंगळागौर या सर्व महिलांनी उत्साहात साजरा केल्याचे व्हिडिओ मधून दिसून येत आहे. अभिज्ञाचे लग्न मेहुल पै सोबत झाले व तो एक ऑपरेशन मॅनेजर असून तो “क्लासवर्क इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेड” मध्ये गेल्या 12 वर्षापासून कार्यरत आहे. अभिज्ञा आता हिंदी मालिकांमध्ये आपली छाप पाडताना दिसणार असून ती पवित्र रिश्ता च्या दुसऱ्या पर्वात दिसणार आहे.

Abhidnya bhave latest news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *