सत्य घटनेवर आधारित असलेल्या देवमाणूस मालिकेने नुकताच निरोप घेतला. ही मालिका ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी सत्य घटनेसारखीच दाखविण्यात आली. परंतु, नंतर वाढत्या टीआरपी मुळे मालिकेत अनेक बदल दाखविण्यात आले. या मालिकेचा शेवट देखील तितकाच अचंबित करणारा दाखविण्यात आला.

Dev manus 2 serial news

देवमाणूस मालिकेच्या शेवटी चंदाने देवी सिंगच्या(डॉक्टरच्या) डोक्यात दगड घालून जखमी केले होते. अनेकांना देवी सिंगचे निधन झाले असे वाटले. परंतु, शेवटी देवी सिंग दवाखान्यात डोळे उघडल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे या गाजलेल्या मालिकेचा दुसरा भाग येणार अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली. या मालिकेचा शेवटचा सीन संपल्यानंतर देवी सिंग आणि चंदा यांनी फॅन्स साठी हा व्हिडिओ बनविला.

 

देवमाणूस मालिकेचा असा शेवट दाखविल्याने या मालिकेचे दुसरे सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “ती परत आलीये” मालिका संपल्यानंतर लगेच देवमाणूस मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते. गेल्या वर्षभरात झी मराठीच्या संपूर्ण टीआरपी पैकी 45% टक्के टीआरपी हा फक्त देवमाणूस या मालिकेने मिळविला. त्यामुळे या मालिकेचा दुसरा भाग येणे साहजिकच आहे.

Dev manus 2 serial news

देवमाणूस मालिकेत देवी सिंगने बोगस डॉक्टरचे रुप धारण करून तब्बल 13 लोकांचे प्राण घेतल्याचे दाखविण्यात आले. देवी सिंग सोबत प्रत्येक गुन्ह्यात सहभागी असणारी डिंपल ही दुसऱ्या भागात देखील दिसणार असल्याचे समजते. त्यामुळे दुसरे सिझन पाहण्यासाठी फॅन्स आतुर असून त्या सिझन मद्ये काय दाखविण्यात येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *