काही दिवसांपूर्वी निरोप घेतलेल्या “देवमाणूस” या मालिकेने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडून काढले. या मालिकेने जे यश मिळविले त्यात मालिकेतील प्रत्येक कलाकारांचा मोलाचा वाटा आहे. कारण प्रत्येक पात्राने मालिकेसाठी आपापले योगदान उत्तमरित्या दिले होते. याच मालिकेतील बज्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यावर एक संकट उभे राहिले आहे.

Dev Manus latest news

देवमाणूस मालिकेत बोगस डॉक्टर अजितकुमारच्या बाजूने नेहमीच उभा राहणाऱ्या व त्याला नेहमीच देवमाणूस म्हणणाऱ्या बज्याचे खरे नाव किरण डांगे आहे. किरणने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करीत प्रेक्षकांना मदतीचे आवाहन केले आहे. किरणचे एक नातेवाईक प्रदीप मोरे हे कोरोना या आजाराशी झुंज देत असून त्यासाठी किरणने मदत मागितली आहे. पाहा त्यांचा हा व्हिडिओ..

 

खूप कमी लोकांना माहिती आहे की किरण हा मालिकेत येण्यापूर्वी रिक्षा चालवायचा. त्यामुळे किरण व त्याच्या कुटुंबाची परिस्थिती बिकट असल्याने त्याने हा मार्ग निवडला. त्याने त्याच्या पोस्टच्या caption मध्ये  लिंक टाकत  मदतीचे आवाहन केले आहे. “को’रोना हा माझ्या घरापर्यंत येईल असे वाटलं देखील नव्हतं”, असे म्हणत किरणने मदत मागितली आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *