अभिनय क्षेत्रात अनेक कलाकार एकत्र काम करताना प्रेमात पडतात व त्यातले काहीजण विवाहबंधनात अडकलेले आपण अनेकदा पाहिलं आहे. 2012 या वर्षी गाजलेल्या “देवयानी” या मालिकेचा अभिनेता संग्राम साळवी याने देखील एका अभिनेत्री सोबतच लग्न केले आहे.

Devyani fame sangram news

“तुमच्यासाठी काय पण” हा संग्रामचा देवयानी मालिकेतील डायलॉग सर्वत्र लोकप्रिय झाला होता. संग्राम व शिवानी सुर्वे यांच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या मालिकेनंतर संग्रामला सरस्वती या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्याच मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडे हिची बहीण तीतिक्षा तावडे ही होती.

खुशबू ही देखील उत्तम अभिनेत्री असून “आम्ही दोघी” या गाजलेल्या मालिकेत देखील तिने काम केले आहे. तसेच “तारक मेहता का उल्टा चष्मा” या मालिकेत तिने पोपटलालच्या आयुष्यात येऊन गेलेल्या बुलबुल नावाचे पात्र साकारले होते.संग्राम व खुशबू या दोघांनी 5 मार्च 2018 रोजी विवाह केला.

Devyani fame sangram news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *