तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर ही गेल्या काही महिन्यांपासून तिच्या बाळाला घेऊन जास्त चर्चेत असते. धनश्री काडगावकर हिला 28 जानेवारी 2021 रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले होते. तेव्हापासून धनश्रीने बाळांचे फोटो व व्हिडिओज सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसून आली. काही दिवसांपूर्वी धनश्रीने बाळाचे बारसे केले होते.

 

धनश्री ने बारशाला बाळाचे नाव कबीर ठेवले व सोबतच फोटो देखील शेयर केला होता. अनेक फॅन्सनी बाळाची फोटो खूपच गोड असल्याचे म्हटले. आता धनश्रीने तिच्या बाळाचा चेहरा दिसणारा प्रथमच एक व्हिडिओ पोस्ट केला. धनश्रीला देखील “बचपन का प्यार” या गाण्याचे वेड लागले असून तिने त्या गाण्यावर तिचा मुलगा कबीर सोबत व्हिडिओ बनविला.

Dhanashri kadagaonkar dance video

या व्हिडिओ मध्ये माय लेकाच्या नात्यातील गोडवा दिसून येत आहे. व्हिडिओ मध्ये कबीर हा खूपच गोड दिसून येत आहे. या व्हिडिओला पाहून अनेक मराठी कलाकारांनी कमेंट मध्ये भरभरून प्रेम दिले. सध्या धनश्री अभिनया पासून दूर राहून बाळा कडे व फिटनेस कडे लक्ष देताना दिसून येत आहे.

 

तुझ्यात जीव रंगला मालिकेत धनश्रीने साकारलेली नंदिताची भूमिका प्रचंड गाजली होती. परंतु, मालिकेच्या शेवटी तिने मालिकेतून निरोप घेतला होता. वाढलेल्या वजनाला कमी करण्यासाठी ती पूर्ण मेहनत घेताना दिसून येत आहे. येत्या काही काळात ती लवकरच अभिनय क्षेत्रात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

Dhanashri kadagaonkar dance video

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.