सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ रातोरात कोणालाही लोकप्रियता मिळवून देऊ शकतो. आपण अनेकदा अशा अनेक नेटकऱ्याना पाहत असतो, ज्यांच्या एका व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळालेले दिसून येतात. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील एका मायलेकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून येत आहे.

Marathi dance viral video

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या लोअर परेल भागात राहणाऱ्या सर्वेशा शरद जामसांडेकर या मुलीने तिच्या इंस्टाग्राम हॅण्डल वर एक व्हिडिओ शेयर केला. त्या व्हिडिओ मध्ये ती व तिची आई सेजल या होत्या. या मायलेकीने “या रावजी” या गाण्यातील ‘गुलहौशी तुम्ही मी अशी गुलछडी’ या ओळीवर रील व्हिडिओ बनविला. या व्हिडिओ मध्ये दोघींचा व्हिडिओ मधील महाराष्ट्रीयन लुक नेटकऱ्याना खूपच आवडला.

बघता बघता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वर सगळीकडे दिसू लागला. सर्वेशाने पोस्ट केलेल्या व्हिडिओला तब्बल 34 लाख लोकांनी पाहिले. सर्वेशाने या अगोदरही अनेक व्हिडिओ पोस्ट केले होते, परंतु तिला खरी लोकप्रियता याच व्हिडिओ मुळे मिळाली. सर्वेशा हीची आई सेजल या देखील आधुनिक विचारांना प्रोत्साहन देऊन लेकी सोबत मनसोक्त व्हिडिओ बनवीत असतात.

या दोघी माय लेकीने “एक मैं और एक तू”, “आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मी जाना”, “कजरा मोहब्बत वाला” अशा अनेक गाण्यावर उत्तम व्हिडिओ बनविले आहेत. तसेच, या दोघींनी “बडी मुश्किल बाबा बडी मुश्किल” या गाण्यावर केलेल्या डान्सला देखील अनेकांनी पसंती दिली.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *