मराठी मालिकांच्या टीआरपीच्या आकडेवारीत स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांनी झी मराठीच्या मालिकांना बरेच मागे टाकले आहे. देवमाणूस व येऊ कशी तशी मी नांदायला या दोन मालिका सोडून बाकी एकाही मालिकेला प्रेक्षकांकडून प्रेम मिळू शकले नाही. त्याच कारणाने आता झी मराठी वाहिनीला तब्बल 5 मालिका बंद कराव्या लागत आहेत. यामुळे एक मोठा बदल घडून या वाहिनीला फायदा होण्याची शक्यता आहे.

 

झी मराठीच्या सध्या चालू असलेल्या मालिकांचा घसरलेला दर्जा यामुळे प्रेक्षकांकडून नापसंती दाखविण्यात आली. 6 पैकी आता 5 मालिका बंद होणार असून नेमके कोणती 1 मालिका चालू राहणार हा प्रश्न फॅन्सना पडला होता. माझा होशील ना? मालिकेचे फॅन्सची संख्या जास्त असून ही मालिका किती दिवस चालणार याबद्दल स्वतः मालिकेत आदित्यची भूमिका साकारणारा विराजस कुलकर्णीने स्पष्ट केले आहे.

Maza hoshil na serial news

विराजस कुलकर्णीने एका व्हिडिओ द्वारे मालिकेचा शेवट कधी व कसा होईल याचे संकेत दिले आहे. मालिकेत आदित्य हा आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा मालक झाल्या नंतर मालिका संपू शकते असे आदित्यने व्हिडिओ द्वारे म्हटले. कोणत्याही मालिकेची एक कथा असते, आणि मग ती पूर्ण झाल्या नंतर मालिका खेचण्यात पण काही अर्थ नसतो, असे विराजस म्हणाला.

Maza hoshil na serial news

विराजसच्या बोलण्यावरून माझा होशील ना ही मालिका देखील बंद होण्याची शक्यता आहे. तसेच, देवमाणूस, अग्गबाई सूनबाई, पाहिले न मी तुला, कारभारी लयभारी या मालिका देखील प्रेक्षकांचा निरोप घेतील. त्यामुळे “येऊ कशी तशी मी नांदायला” ही एकमेव मालिका पुढे चालू राहणार असल्याचे समजते. त्यामुळे माझा होशील ना? मालिकेच्या फॅन्स साठी हि एक निराशाजनक बातमी

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *