श्रावण महिन्याच्या नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. बहीण भावाच्या प्रेमळ नात्यासाठी साजरा केला जाणाऱ्या या सणाला बहीण ही भावाला राखी बांधत असते. भावाने बहिणीचे संरक्षण करावे हा देखील त्या मागचा हेतू असतो. परंतु, एका मराठी अभिनेत्रीने तिच्या मोठ्या बहिणीला ओवाळून समाजाला एक संदेश दिला आहे.

Monalisa bagal in raksha bandhan special

गस्त चित्रपटातून अनेकांची मने जिंकलेल्या मोनालिसा बागल या अभिनेत्रीने आज आगळेवेगळे रक्षाबंधन साजरे केले. मोनालीसा हीने तिची मोठी बहीण अश्विनी बागल हिला राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. या दोघी बहिणींना भाऊ नसल्याने दोघींनी अशा पद्धतीने सण साजरा केला. दोघींच्या या सुंदर निर्णयाचे अनेकजण कौतुक करताना दिसून येत आहेत.

 

कोण म्हणतं बहीण फक्त भावालाच ओवाळते? फक्त भावालाच राखी बांधायची का? असे प्रश्न विचारीत मोनालिसाने तिच्या बहिणीचे आभार मानले आहेत. “कायम माझ्या सामर्थ्याचा आधारस्तंभ राहण्यासाठी धन्यवाद. दीदी नेहमी माझ्यासोबत राहा, माझे संरक्षण करीत राहा आणि अजून प्रेम करीत राहा. आय लव्ह यू.” अशा शब्दात मोनालीसाने तिच्या बहिणीला शुभेच्छा दिल्या.

Monalisa

 

अनेक कुटुंबात कोणाला भाऊ नसतो, तर कोणाला बहीण नसते. त्यामुळे रक्षाबंधनाला त्याची उणीव जाणवत असते. परंतु, मोनालीसाने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. जसे भाऊ बहिणीचे संरक्षण करतो, तसेच एक बहीण देखील दुसऱ्या बहिणीचे संरक्षण करू शकते, असेच मोनालीसाने यातून दाखवून दिले.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *