सर्व भारतीयांसाठी आज 7 ऑगस्ट हा दिवस क्रीडा क्षेत्रातील सोनेरी दिवस ठरला. भारताचा भालाफेक खेळातील स्टार खेळाडू नीरज चोप्रा याने आज झालेल्या फायनल मध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले आहे. हा विजय मिळविल्या नंतर नीरज वर सर्व स्तरांतून कौतुकांचा वर्षाव होत आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राला कॉल करून शुभेच्छा दिल्या.

 

गोल्डन बॉय नीरज चोप्रा हा हरियाणा राज्यातील पानिपतच्या खंद्रा या गावातील रहिवाशी आहे. परंतु, खूप कमी लोकांना माहिती की नीरजचे वंशज हे मराठा होते. त्यांच्या वंशजांनी पानिपतच्या युद्धात सहभाग घेतला होता, असे स्वतः नीरज याने हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत हे बोलून दाखविले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेसाठी हि खरेच एक अभिमानाची गोष्ट आहे.

Neeraj chopra

 

फायनल सामन्यात नीरज चोप्रा विरुद्ध अंतिम 12 स्पर्धकापैकी पाकिस्तानचा अर्शद नदीम देखील होता. परंतु, नदीमला कोणतेच मेडल जिंकता आले नाही व तो 5व्या क्रमांकावर राहिला. सामन्यानंतर नदीमने नीरज चोप्रासाठी एक ट्विट लिहिले. “माझा आदर्श असलेल्या नीरज चोप्राला गोल्ड मेडल जिंकण्यासाठी अभिनंदन. सॉरी पाकिस्तान मी मेडल आणू शकलो नाही” असे नदीम ने म्हटले. त्यामुळे नीरजचे इंडिया प्रमाणेच परदेशातून देखील तितकेच कौतुक होत आहे.

Neeraj chopra


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.