सोशल मीडियावर आपण अनेकदा रस्त्यावर फिरणारे भिकारी, मनोरुग्ण लोकांच्या टॅलेंटचे व्हिडिओ पाहिले असतील. यातील काही लोकांना कुटुंबाकडून अन्याय झालेला असतो तर काहीजण वेडसर झाल्याने भटकंती करीत असतात. परंतु, यातील काही लोकांच्या आत असे काही टॅलेंट लपलेले असते की ते पाहून अनेकजण अचंबित होतात.

Old lady talk in english

सध्या अशाच एका वृध्द महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ बँगलोर येथील असून शाचीना हेग्गर नामक महिलेने या वृध्द महिलेचा व्हिडिओ शूट केला. ही महिला बँगलोर येथील सदाशिव नगर येथे चिंध्या वेचत असते. परंतु, तिची स्पष्ट इंग्लिश भाषा ऐकून अनेकांनी आश्चर्याचा धक्का बसत आहे.

सदरील व्हिडिओ मधील वृध्द महिलेचे नाव सिसिलिया मार्गारेट लॉरेन्स असल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओ मध्ये ती गुजरातच्या गांधीनगर येथील असल्याचे सांगते व तिने 7 वर्ष जपान मद्ये राहिल्याचे ती स्वतः सांगताना दिसून येत आहे. तिच्या सांगण्यावरून तर ती खूप मोठ्या फॅमिली मधून असल्याचे समजते. तिला जेंव्हा तू एकटी आहेस का असे विचारण्यात आले तेंव्हा तिने एक फोटो दाखवून मी एकटी नसल्याचे सांगितले.

पुढे या वृध्द महिलेने एक इंग्लिश गाणे देखील गाऊन दाखविले. एकदम अचूक व उत्तमरीत्या तिने ते गाणे गायले. तिच्यातील हे टॅलेंट पाहता सोशल मीडियावर आता तिला न्याय देण्यासाठी नेटकरी हा व्हिडिओ शेयर करताना दिसून येत आहेत. ती महिला नक्कीच कोणीतरी चांगल्या घराण्यातील असू शकते व तिला तिच्या घरच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न नेटकऱ्याकडून करण्यात येत आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *